महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गुगल करणार ‘एआय’मध्ये मजबूत प्रवेश

06:30 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुंतवणुकीसाठी आखणार नवीन व्यूहरचना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

एआयच्या जगात आपला प्रवेश मजबूत करण्याच्या तयारीत असलेल्या गुगलने कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे गुगल आता एआयच्या विश्वातही आपले पाय मजबूत करण्याच्या तयारीत आहे. अलीकडील बातम्यांनुसार, गुगल चॅटबॉट स्टार्टअप कॅरेक्टर एआयमध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या योजनेवर काम करत आहे. या स्टार्टअपला मॉडेल्सचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि वापरकर्त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी भांडवल उभारणार आहे.

या संदर्भात रॉयटर्सच्या अहवालात म्हटले आहे की, गुगल या गुंतवणुकीसाठी परिवर्तनीय स्वरूपात एक रचना तयार करू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो, कॅरेक्टर एआय आधीच गुगलच्या क्लाउड सेवांसह टेन्सर प्रोसेसिंग युनिट्स  मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी वापरते.

नवीन भागीदारी मजबूत करेल

यात दोघांमधील विद्यमान भागीदारी आणखी घट्ट होईल.ध्

कॅरेक्टर एआयचा प्रारंभ गुगलचे माजी कर्मचारी नोआम शाजिर व

डॅनियल डी फ्रीटास यांनी केली. स्टार्टअप लोकांना स्वत:चे

चॅटबॉट्स व एआय सहाय्यक तयार करून देते, सेलिब्रिटींच्या आभासी

अॅनिम पात्रांशी चॅट करते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article