गुगल ‘विझ’ची 2.7 लाख कोटींना खरेदी करणार
हा गुगलचा सर्वात मोठा करार : क्लाउड सुरक्षा व्यवसायात मायक्रोसॉफ्टसोबत स्पर्धा करणार
वृत्तसंस्था/ न्युर्यार्क
टेक कंपनी गुगलने क्लाउड सुरक्षा फर्म विझ (sंघ्Z) ला 2.7 लाख कोटी रुपये मध्ये खरेदी (32 अब्ज डॉलस) करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात कंपनीने विझसोबत करार केला आहे. हा गुगलचा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार असल्याचेही म्हटले आहे. या करारांतर्गत, विझ गुगलच्या क्लाउड व्यवसायाचा भाग बनला आहे. खरेदीबाबत गुगलने म्हटले आहे की, आमची क्लाउड सुरक्षा सेवा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे. वीझ जोडल्याने ती आणखी चांगली होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.
सुरक्षा मजबूत करण्यासाठी एआय व्यवहार
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) कडून वाढत्या सायबर धोक्यांना रोखण्यासाठी हा करार केला जातो. क्लाउड सुरक्षा व्यवसायात मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करणे हे गुगलचे लक्ष्य आहे. विझच्या मदतीने मल्टीक्लाउड तंत्रज्ञान आणखी सुधारले जाईल.
2023 मध्ये दिली होती ऑफर
जुलै 2023 मध्ये गुगलने विजला 23 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याची ऑफर दिली होती. परंतु विझने ही ऑफर नाकारली. 2026 मध्ये नवीन करार पूर्ण होईल अशी उमेद ठेवली होती.
सुरक्षा मजबूत करतील : सीईओ सुंदर पिचाई
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, सुरुवातीपासूनच गुगलचे लक्ष मजबूत सुरक्षेवर आहे. आज क्लाउडवर चालणाऱ्या व्यवसायांना क्लाउड प्रोव्हायडर्समध्ये उच्च सुरक्षा हवी आहे. विझसोबत मिळून, आम्ही क्लाउड सुरक्षेला एका नवीन पातळीवर घेऊन जाण्यास मदत होणार असल्याचा दावाही यावेळी पिचाई यांनी केला आहे.