‘गुगल पिक्सेल 8’आवृत्ती आता मेड इन इंडिया
फॉक्सकॉनने सुरु केले चाचणी उत्पादन : लवकरच भेटीला येणार
नवी दिल्ली :
भारतीय बाजारपेठेत विकले जाणारे गुगल पिक्सेल 8 आवृत्तीचे स्मार्टफोन आता देशातच निर्माण केले जाणार आहेत. या संदर्भातील माहिती कंपनीने एक्सच्या पोस्टमध्ये दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘मेड इन इंडिया’ पिक्सेल 8’ मालिका स्मार्टफोनची पहिली आवृत्ती लवकरच स्टोअरमध्ये उपलब्ध होणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.
कंपनीने ऑक्टोबर 2023 मध्ये या स्मार्टफोन निर्मितीची घोषणा केली होती. कंपनीच्या पुरवठा भागीदार फॉक्सकॉनने दुसऱ्या तिमाहीत चाचणी उत्पादन सुरु केले आहे. आता गुगल पिक्सेल 8 स्मार्टफोन भारतीय बाजारात स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहे.
केंद्र सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इनिशिएटिव्ह योजनेअंतर्गत गुगल आपले फोन भारतात असेंबल करत आहे. गुगल, अॅपल, सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पो आणि वनप्लस या कंपन्या भारतात त्यांचे स्मार्टफोन तयार करण्यापूर्वी आपल्या एक्स पोस्टमध्ये गुगलने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे भारतात पिक्सेल स्मार्टफोन एकत्र करण्यासाठी भारत सरकारसोबत सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आहेत.
गुगल पिक्सेल 8 चा तपशील :
पिक्सेल 8 मध्ये 6.2 इंचाचा अॅक्वा डिस्प्ले आहे, जो पिक्सेल 7 च्या डिस्लेपेक्षा 42 टक्क्यांनी अधिकचा चांगला दर्जा देणार आहे. तर पिक्सेल 8 प्रो ला एलटीपीओ ओल्ड पॅनलवर आधारीत 6.7 इंच सुपर अॅक्टुआ डिस्प्ले आहे. साधारण चमक ही 2,400 एनआयटीएस आहे. फोन 30 मिनिटांत 50 टक्के चार्ज होतो.