गुगलने 11,000 हून अधिक युट्यूब चॅनेल हटविले
आतापर्यंत एकंदर हटवलेल्या चॅनेल्सची संख्या 34,000 वर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत गुगलने युट्यूबवरून 23 हजार चॅनेल्स काढले आहेत. तर गुगलने व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबवरून 11,000 हून अधिक चॅनेल आणि अकाउंट्स हटविले आहेत. या सर्वांवर चीन, रशिया आणि इतर देशांशी संबंधित प्रचार पसरवल्याचा आरोप आहे. चॅनेलवरील ही कारवाई 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल-जून) करण्यात आली. गुगलच्या थ्रेट अॅनालिसिस ग्रुप (टॅग) द्वारे चुकीची माहिती आणि प्रभाव पाडण्याच्या कारवायांना रोखण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
काय प्रकरण आहे?
गुगलने म्हटले आहे की काढून टाकलेल्या 7700 चॅनेलपैकी बहुतेक चॅनेल चीनशी संबंधित होते. यामध्ये हिंदी, चिनी आणि इंग्रजी भाषेतील व्हिडिओंचा समावेश होता, ज्यामध्ये चीन सरकार, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे कौतुक करणारे आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर भाष्य करणारे व्हिडिओ होते. पहिल्या तिमाहीत 23,000 हून अधिक खाती हटवण्यात आली, म्हणजेच 2025 मध्ये आतापर्यंत 34,000 हून अधिक चॅनेल हटवण्यात आले आहेत. यावर गुगलचे म्हणणे आहे की हे चॅनेल ‘समन्वित प्रभाव ऑपरेशन्स’चा भाग होते, म्हणजेच ते एका विशिष्ट उद्देशाने पद्धतशीरपणे चालवले जात होते. चिनी चॅनेल त्यांच्या देशाची प्रतिमा उजळवण्यात आणि अमेरिकेला लक्ष्य करण्यात व्यस्त होते, गुगलच्या टॅग टीमने त्यांना शोधून प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले.
मेटाने 1 कोटी बनावट प्रोफाइल काढल्या
गुगल एकटा नाही. मेटाने गेल्या आठवड्यात असेही वृत्त दिले की 2025 च्या पहिल्या सहामाहीत त्यांनी जवळजवळ 1 कोटी बनावट प्रोफाइल काढून टाकले आहेत, जे प्रमुख सामग्री निर्मात्यांची खोटी होती.