Satara News :"श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास लंडनच्या संचालिका कॅथरीन पारसन्स यांची सदिच्छा भेट"
कॅथरीन पारसन्स यांनी संग्रहालयातील विविध दालनांची केली पाहणी
by इम्तियाज मुजावर
सातारा : साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझीयमच्या कलेक्शन केअर अँड ऍक्सेस विभागाच्या संचालिका श्रीमती कॅथरीन पारसन्स यांनी सदिच्छा भेट दिली आहे
या प्रसंगी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर श्रीमती पारसन्स यांनी संग्रहालयातील विविध दालनांची पाहणी केली. अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी त्यांना संग्रहालयातील सर्व ऐतिहासिक वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील विविध दस्तऐवज आणि कलाकृतींची सविस्तर माहिती दिली.
संचालिका पारसन्स यांनी संग्रहालय पाहून समाधान व्यक्त केले असून, संग्रहालयाच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. या वेळी सर्व संग्रहालय कर्मचारीही उपस्थित होते. इतिहास व संस्कृतीचा सेतू बांधणारी ही भेट नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.