सिंधुदुर्गनगरीत गोवा बनावटीच्या दारूसह ८० लाखांचा मुद्देमाल जप्त
ओरोस । प्रतिनिधी
गोवा येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पोमधून DD ०१ AA - ९६४८बेकायदा गोवा बनावटीच्या रुपये 55 लाख 75 हजार 680 रुपये किंमतीच्या दारूसह टेम्पो चालक राघोबा रामचंद्र कुंभार (वय 35) रा- पेडणे ,गोवा याला ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या दोन पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई सिंधुदुर्गनगरी येथील हॉटेल राजधानी समोरील हायवे रोडवर करण्यात आली. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पोची किंमत रुपये 25 लाख त्याचबरोबर 55 लाख 75 हजार 680 रुपये गोवा बनावटीची दारू असा एकूण 80 लाख 75 हजार 680 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सचिन हुंदळकर, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषणचे गणेश कऱ्हाडकर , सायबर पोलीस ठाण्याचे श्री रामचंद्र शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल डॉमनिक डिसोजा, सदानंद राणे, प्रकाश कदम, किरण देसाई, बस्त्याव डिसोझा, जॅक्सन घोन्साल्विस आदींच्या पथकाद्वारे करण्यात आली.