1 तासात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार सामान
अंतराळातून होणार डिलिव्हरी
क्विक कॉमर्स कंपन्यांनी सध्या वेगळाच फंडा अवलंबिला आहे. अनेक कंपन्या केवळ 10-15 मिनिटांमध्ये तुमच्या घरी सामान डिलिव्हर करतात. तर काही कंपन्या एक ते दोन दिवसांमध्ये एका शहरातून दुसऱ्या शहरात सामग्री पोहोचवितात. अशाच इंटरनॅशनल पार्सलची डिलिव्हरीत 5-15 दिवसांचा कालावधी लागतो.
परंतु जर कुणी एका तासात जगाच्या कानाकोपऱ्यात सामग्री पोहोचवित असेल तर? लॉजिस्टिकच्या जगतात एक क्रांतिदाखल ही सेवा आली आहे. या सेवेत स्पेस डिलिव्हरी व्हेईकलचा वापर केला जाणार आहे. एक अमेरिकन कंपनी ही सेवा घेऊन आली आहे. कंपनीचे नाव इन्व्हर्जन आहे. एअरोस्पेस आणि डिफेन्स सेक्टरमध्ये काम करणाऱ्या इन्व्हर्जनने जगातील पहिले स्पेस डिलिव्हरी व्हेईकल तयार केले आहे. हे व्हेईकल अंतराळाच्या मार्गे पृथ्वीच्या कुठल्याही शहरात केवळ 60 मिनिटांमध्ये डिलिव्हरी करू शकते. हे काम कंपनीचे आर्क व्हेईकल करते.
आर्क एक रिएंट्री व्हेईकल आहे, म्हणजेच हे अंतराळात जाऊन पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात परतू शकते. आर्क व्हेईकल 8 फूट लांब आणि 4 फूट रुंद्र अंतराळयानाप्रमाणे आहे. एकावेळी हे 227 किलोग्रॅमपर्यंत सामग्री वाहून नेऊ शकते. म्हणजेच तुम्ही यावर 227 किलोग्रॅमपर्यंतची कुठलीही सामग्री लोड करू शकता. यानंतर आर्क व्हेईकल पृथ्वीपासून 1000 किलोमीटर वर अंतराळात पोहोचेल. तेथून व्हेईकल उ•ाण करत डिलिव्हरी पॉइंटवर पोहोचल्यावर पृथ्वीवर परतणार आहे. वायुमंडळात प्रवेश केल्यावर हे पॅराशूटच्या मदतीने लँड करेल. आर्क व्हेईकल 25 हजार किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने उ•ाण करू शकते.
स्पेस डिलिव्हरी व्हेईकलचा वापर अनेक पद्धतींनी होऊ शकते. युद्धादरम्यान हे अत्यंत उपयुक्त ठरू शकते. आर्क व्हेईकल अंतराळात थांबूही शकते. हे स्पेस डिलिव्हरी व्हेईकल 5 वर्षांपर्यंत अंतराळात राहू शकते, यामुळे हे युद्धाच्या काळात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हा ऑटोनॉमस स्पेसक्राफ्ट रियूज केला जाऊ शकतो आणि कमी खर्चिक असल्याचा कंपनीचा दावा आहे. एकदा याच्या माध्यमातून सामग्री पाठविल्यावर त्याला पुन्हा देखील वापरले जाऊ शकते. परंतु या सेवेकरता किती शुल्क आकारले जाईल आणि ती कधी सुरू केली जाईल याविषयी कुठलीच माहिती नाही.