महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सनबर्न’ महोत्सवाचा गोव्याला अलविदा

12:19 PM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : गोव्यात गेल्या अनेक वर्षांपासून नववर्ष स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘सनबर्न’ महोत्सवाने गोव्यातून गाशा गुंडाळला असून काही दिवसांपूर्वी 2023 वर्ष अखेरीस झालेला ‘सनबर्न’ हा शेवटचा महोत्सव असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. ‘सनबर्न’चे आयोजक हरींद्र सिंग यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वरील माहिती दिली आहे. ते म्हणतात की, डिसेंबर 2023 मधील गोव्यातील हा माझा शेवटचा सनबर्न असून त्याचा प्रवास आता संपला आहे. त्या प्रवासात कष्ट, आनंद, मौज-मजा, भावना इत्यादी बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. गेली अनेक वर्ष गोवा राज्यात ‘सनबर्न’ सन्मानाने आयोजित केल्याचा आनंद आहे. परंतु आता त्याचे आयोजन गोव्यात पुन्हा करू शकणार नाही याचे दु:ख वाटत असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. दरवर्षी ‘सनबर्न’मध्ये रात्री 12 वाजेपर्यंत संगीत वाजवण्यास अनुमती मिळत होती. परंतु यंदा म्हणजे 2023 सनबर्नला रात्री फक्त 10 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली. त्यामुळे या महोत्सवाला मोठा फटका बसला. खास सनबर्नसाठी गोव्यात येणाऱ्या देश, विदेशी पर्यटकांना निर्बंध रूचले नाहीत. विविध कारणांमुळे 2023 चा सनबर्न वादग्रस्त ठरला आणि त्याचा उलटा परिणाम झाला. प्रतिसाद ओसरला. पर्यटकही हिरमुसले. त्यामुळे 2024 मध्ये ‘सनबर्न’ बाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असून आयोजकांनी तो आता होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article