लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी पतसंस्थेच्या आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद
माधवबाग क्लिनिकच्या सहकार्याने आयोजन
वास्को : लोकमान्य बहुउद्देशीय सहकारी पतसंस्थेतर्फे माधवबाग मल्टिडिसीप्लिनरी कार्डियाक केअर क्लिनिक व पर्वरी येथील लेन्स अॅण्ड स्पॅक्सच्या सहकार्याने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. या शिबिरात मोफत नेत्र चिकित्सा, रक्तदाब, मधुमेह तपासणी करण्यात करण्यात आली. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वास्को शाखेमध्ये आयोजित केलेल्या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांची माधवबाग मल्टिडिसीप्लिनरी कार्डियाक केअर क्लिनिकचे डॉ. स्नेहा नाईक, डॉ. रश्मी नाईक, दिनेश चलवादी यांनी तपासणी करून मार्गदर्शन केले. लेन्स अॅण्ड स्पॅक्सचे डॉ. संगीत सुदन, डॉ. निशा शेख यांनी नागरिकांची नेत्र तपासणी केली. यावेळी लेन्स अॅण्ड स्पॅक्सचे तैसिन शेख व अलोयसियस डायस उपस्थित होते. प्रारंभी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वास्को शाखेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक वासु आमोणकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. वास्को शाखेच्या साहा. व्यवस्थापक भक्ती कुलकर्णी, जुही बुगडे, स्नेहा नाईक, हिमानी धुरी, अंजली दळवी, नितीक्षा दिवाकर, मनोहर लिंगवे आदी उपस्थित होते.