For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून गुड न्यूज...वाघिणीकडून वंशवृद्धी

10:28 AM Aug 04, 2025 IST | Radhika Patil
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून गुड न्यूज   वाघिणीकडून वंशवृद्धी
Advertisement

कराड :

Advertisement

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिवास करणारी एख्ऊ02 ही वाघीण सह्याद्री-कोकण पट्ट्यातील वाघांचा वंश वृद्धिंगत करणारी सह्याद्रीची जननी ठरली आहे. 2014 ते 2025 या कालावधीत या वाघिणीने तीन वेळा पिल्लांना जन्म दिल्याची नोंद करण्यात आली असून तिच्या लेकीदेखील आता सह्याद्रीच्या खोऱ्यात प्रजनन करत आहेत. नातवंडांनीही आता स्वतंत्र अधिवास तयार केला आहे.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आजही वाघांचा कायमस्वरुपी अधिवास आहे. वन विभागाच्या मदतीने हा अधिवास अभ्यासण्याचे काम ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’चे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

Advertisement

सह्याद्रीतील वाघांच्या संचार मार्गाला सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग म्हटले जाते. सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गाचा विस्तार हा महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे. संपूर्ण भ्रमणमार्ग प्रदेशात साधारण 32 वाघांचे अस्तित्व आहे, तर केवळ महाराष्ट्रातील सह्याद्रीचा विचार केल्यास ही संख्या अकरा ते बाराच्या घरात आहे. यामधील एख्ऊ02 या वाघिणीच्या अस्तित्वाची नोंद गिरीश पंजाबी 2014 सालापासून करत आहेत.

SK म्हणजे सह्याद्री-कोकण,T  म्हणजे टायगर आणि 02 म्हणजे क्रमांक. SKT02 या वाघिणीने 2013, 2015 आणि 2017 या कालावधीत पिल्लांना जन्म दिला आहे. 2017 सालानंतर तिच्यासोबत पिल्लांची नोंद करण्यात आलेली नाही. 2023 साली कॅमेऱ्यात टिपलेल्या फोटोवरुन ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. मात्र, पिल्लांची नोंद झाली नाही. सद्यस्थितीत अंदाजे 15 वर्षाची असणारी ही वाघीण आजही निर्भयपणे महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या जंगलात वावरत आहे. त्यामुळे सह्याद्रीतील वाघांचा कुळ ती अजून कितपत वाढवेल, याविषयी वन्यजीव अभ्यासकांना उत्सुकता आहे.

  • पिल्लांच्या नोंदी

सर्वप्रथम 2014 साली SKT 02 वाघिणीचे छायाचित्र पंजाबी आणि टीमला कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून मिळाले. त्यावर्षी SKT 02 वाघिणीच्या हद्द क्षेत्रात एक पूर्ण वाढ होत आलेली दुसरी मादीही आढळून आली. सर्वसामान्यपणे एक वाघीण दुस्रया वाघिणीला आपली मुलगी असल्याशिवाय आपल्या हद्दीत वावरु देत नाही. त्यामुळे छायाचित्रित कैद झालेली मादी ही SKT 02 वाघिणीची मुलगी असल्याचे मानून तिला SKT 03 असा क्रमांक देण्यात आला. 2015 साली SKT 02 वाघीण गवा खाताना कॅमेऱ्यात टिपली गेली. त्यावेळी तिच्यासोबत तीन पिल्ले आढळली.

2017 साली पुन्हा एकदा SKT 02 वाघिणीसोबत लहानग्या तीन पिल्लांची नोंद करण्यात आली. यामधील एख्ऊ07 ही मादी तिचीची मुलगी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. पुढे जाऊन 2021 साली ही मादी गोव्यातील म्हादाई अभयारण्यात आढळली. तर 2015 साली SKT 02 च्या पोटी जन्मास आलेली SKT  04 ही मादी आता प्रौढ झाली असून तिच्यासोबत 2024 साली तीन पिल्ले वावरताना दिसली आहेत.

  • व्याघ्र संवर्धनाचे प्रतीक

SKT 02 ही वाघीण केवळ सह्याद्रीच्याच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम घाटातील व्याघ्र संवर्धनाचे प्रतीक आहे. सह्याद्रीच्या जंगलातील अधिवास सुधारला असून, व्याघ्र पुनर्स्थापनेसाठी आवश्यक ती सर्व तयारी केली गेली आहे. व्याघ्र पुनर्स्थापना, शाकाहारी प्राण्यांचे पुनर्वसन, आणि लँडस्केपस्तरीय व्यवस्थापन ही पुढील धोरणात्मक पावले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम घाटात व्याघ्र पुनरुज्जीवनाचा आदर्श ठरत आहे.
                                                                                                  तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

  • पिल्लांकडून अधिवासाची निर्मिती

2014 पासून आम्ही एख्ऊ02 चा अभ्यास करत आहोत. तिच्या पिल्लांनी संचार मार्गात अधिवास निर्माण केला आहे, याचा अर्थ सह्याद्रीतील माद्यांचे प्रजनन यशस्वी झाले आहे.
                                                                                                            गिरीश पंजाबी, वन्यजीव संशोधक

  • व्याघ्रभ्रमण मार्ग दीर्घ व्यवस्थापनामुळे जिवंत 

तिलारी ते चांदोली, चांदोली ते कोयना असा संचार मार्ग वनविभागाच्या दीर्घकालीन व्यवस्थापनामुळे आजही जिवंत आहे. आता लँडस्केपस्तरीय धोरणाला गती मिळत आहे, हे फार महत्त्वाचे आहे.
                                                                                                              रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक

Advertisement
Tags :

.