Pandharpur : विठ्ठल भक्तांसाठी आनंदवार्ता! कार्तिकी यात्रेसाठी 550 एसटी बसेस सज्ज
कार्तिकी यात्रेसाठी एसटीची विशेष तयारी
सोलापूर : कार्तिकी यात्रेनिमित्त यंदा राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष तयारी केली आहे. राज्यातून तब्बल ५५० बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी सोलापूर विभागाच्या १५० बसेस यात्रेकरूंसाठी सज्ज करण्यात आल्या आहेत.
सोलापूर २३, पंढरपूर १५, बार्शी ३०, अक्कलकोट १३, करमाळा १४, अकलूज १०, सांगोला १३, कुर्जुवाडी १८, मंगळवेढा १४ अशा एकूण १५० बसेस विविध मार्गावर धावतील. याशिवाय पंढरपूर, मंगळवेढा, अक्कलकोट, शिखर शिंगणापूर तसेच सोलापूर-बार्शी मार्गावरही जादा बसेस उपलब्ध असतील. पंढरपूर-मुंबई आणि पंढरपूर-पुणे या प्रमुख मार्गावरही प्रवाशांची सोय करण्यात आली आहे.
यात्रेच्या कालावधीत सर्व नियमित प्रवासी सवलती लागू राहतील. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना: १०० टक्के प्रवासभाड्यात सूट, महिला सन्मान योजना: ५० टक्के प्रवासभाड्यात सूट असणार आहे, असेही एसटीकडून सांगण्यात आले आहे.
सोलापूर विभागाचे नियोजन
कार्तिकी एकादशीनिमित्त यंदाच्या वर्षी सोलापूर विभागासह पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागात एकूण ५५० एसटीचे नियोजन केले आहे. सोलापूर विभागातूनदेखील भक्तांच्या सोयीसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा २ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.
- अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक, सोलापूर
वाहतुकीची सोय
कोल्हापूर विभाग : १०० बसेस
पुणे विभाग : १०० बसेस
सांगली विभाग: १०० बसेस
सातारा विभाग: १०० बसेस
सोलापूर विभाग : १५० बसेस
वारकऱ्यांसाठी सवलती कायम