For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोमटेश, जीएसएस थ्रोबॉल विजेते

10:37 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोमटेश  जीएसएस थ्रोबॉल विजेते
Advertisement

जिल्हास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयीन थ्रोबॉल स्पर्धा

Advertisement

बेळगाव : सुरेबान येथे पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय सुरेबान आयोजित जिल्हास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयीन थ्रोबॉल स्पर्धेत गोमटेश संघाने सौंदत्ती संघाचा तर मुलींमध्ये जीएसएसने सौंदत्ती संघाचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. हे दोन्ही संघ राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.सुरेबान येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत मुलांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सौंदत्ती संघाने रामदुर्ग तालुका संघाचा 15-9, 15-13 अशा सेटमध्ये तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगावच्या गोमटेश पदवीपूर्व महाविद्यालयाने कित्तूर तालुका संघाचा 15-5, 15-2 अशा सेटमध्ये पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत गोमटेश संघाने सौंदत्ती तालुका संघाचा 15-7, 15-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले. मुलींच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सौंदत्ती तालुका संघाने कित्तूर तालुका संघाचा 15-9, 15-13 संघाचा तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगावच्या जीएसएस संघाने खानापूर तालुका संघाचा 15-8, 15-4 अशा सेटमध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत जीएसएस बेळगाव संघाने सौंदत्ती तालुका संघाचा अटितटीच्या लढतीत 14-16, 15-11, 15-9 अशा सेटमध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले.

Advertisement
Advertisement
Tags :

.