5 रस्त्यामध्येच ’गोलमाल’, 11 रस्त्यांचे काय होणार?
कोल्हापूर :
नगरोत्थान योजनेतून शहरातील खराब झालेल्या 16 रस्यांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर झाला असून कामे सुरू झाली आहेत. येथील रस्त्याच्या पाहणीत डांबराचे प्रमाण योग्य नसल्याचे दिसून आले आहे. सध्या पाच रस्तेच सुरू असून यामध्ये गोलमाल दिसून आला आहे. मग पुढील 11 रस्त्यांची काय आवस्था होणार असा सवाल आता उपस्थित होत आहे.
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर शहरातील रस्ते खराब झाल्याने महायुती सरकारने विशेषबाब म्हणून 100 कोटींचा निधी मंजूर केला. पहिल्या टप्प्यात पाच रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. परंतू ही कामे गतीने झाली नाहीत. एकही रस्ता 100 टक्के पूर्ण झालेला नाही. तसेच केलेले कामही निकृष्ट दर्जाचे होत आहे. मंगळवार पेठेतील शाहू बँक चौक ते नंगिवली चौकमध्ये केलेला रस्ता पहिल्या पावसातच खराब झाला आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी विचारले असता त्यांनी अंतिम थर देणे बाकी असल्याचे सांगितले. खराब झालेल्या रस्त्याबाबत सामाजिक संघटनांकडूनहीप्रश्न चिन्ह उपस्थित केले. यावर प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली असता रस्त्याची कामे दर्जदार झाली नसल्याचे आढळून आले. डांबराचे प्रमाणही कमी असल्याचे तपासणी दिसून आले. यानंतर मनपाने शहर अभियंतासह ठेकेदारावर कारवाई केली आहे. पहिल्या पाच रस्त्यांची ही स्थिती असेल तर उर्वरीत 11 रस्त्यांची काय आवस्था असणार असा आता नागरिकांना प्रश्न पडत आहे. येथून पुढे मनपाने स्वतंत्र टिमच नियुक्ती करून लक्ष ठेवावे लागणार आहे.
कनिष्ठ अभियंता, उपशहर अभियंतांकडून पाहणी गरजेची
पाच रस्त्याची कामे विभागीय कार्यालयांतर्गत सुरू आहेत. संबंधित उपशहर अभियंता आणि कनिष्ठ अभियंतानी वास्तविक काम सुरू असताना जागेवर जावून कामाची पाहणी करणे अपेक्षित आहे.