For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोल्डन बॉयची सोनेरी कामगिरी

06:32 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोल्डन बॉयची सोनेरी कामगिरी
Advertisement

पावो नुरमी गेम्समध्ये 85.97 मी. भाला फेकत मिळवले सुवर्ण

Advertisement

वृत्तसंस्था/ हेलंसिकी (फिनलँड)

गोल्डन बॉय नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी जबरदस्त फॉर्म दाखवला. नीरज चोप्राने पावो नुरमी गेम्समध्ये सुवर्ण जिंकले. फिनलंडमधील तुर्कू येथे झालेल्या पावो नूरमी गेम्समध्ये नीरजने तिसऱ्या प्रयत्नात 85.97 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. नीरजने तिसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम थ्रो फेकला. विशेष म्हणजे, पॅरिस ऑलिम्पिकला अवघे काही दिवस राहिले असताना नीरजने शानदार कामगिरी करत आपणच सुवर्णपदकासाठी दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे.

Advertisement

पावो नुरमी स्पर्धेत नीरजने प्रथमच सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. गतवर्षी दुखापतीमुळे त्याने या स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता तर 2022 मध्ये त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र नीरजने सुवर्णवेध घेत शानदार कामगिरी साकारली. फिनलंडचा टोनी केरानेन दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने 84.19 मी. भालाफेक करत रौप्यपदक जिंकले तर फिनलंडच्या ऑलिव्हर हेनलँडरने 83.96 मी.सह कांस्यपदक पटकावले.

नीरजने पहिल्याच प्रयत्नात 83.62 मी. असा थ्रो केला. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तो केवळ 83.45 मीटर थ्रो करू शकला आणि तो ऑलिव्हर हेनलँडरपेक्षा मागे राहिला. ऑलिव्हरने दुसऱ्या प्रयत्नात 83.96 मीटर थ्रो केला होता. यानंतर तिसऱ्या प्रयत्नात नीरज त्याच्या पुढे गेला, जो त्याचा सर्वोत्तम थ्रो ठरला. 8 खेळाडूंपैकी नीरज एकमेक खेळाडू होता, ज्याने 85 मीटरचा टप्पा पार केला. तिस्रया थ्रोनंतर नीरजचे उरलेले थ्रो खूपच कमकुवत होते. चौथ्या प्रयत्नात तो केवळ 82.21 मी. भालाफेक करु शकला. नीरजचा पाचवा प्रयत्न फाऊल झाला. यानंतर सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्याने 82.97 मीटर थ्रो केला. नीरजने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. आता, पॅरिस ऑलिम्पिकसाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेआधी त्याने या स्पर्धेत केलेली कामगिरी नक्कीच अभिमानास्पद आहे.

Advertisement
Tags :

.