For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोल्डन ज्युबिली रन मॅरेथॉन पोलीस दलातर्फे उत्साहात

11:11 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोल्डन ज्युबिली रन मॅरेथॉन पोलीस दलातर्फे उत्साहात
Advertisement

बेळगाव : अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागृती करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने आयोजित करण्यात आलेली गोल्डन ज्युबिली रन मॅरेथॉन उत्साहात पार पडली. रविवारी सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक व प्रभारी पोलीस आयुक्त विकाशकुमार विकाश यांच्या हस्ते ध्वज दाखवून मॅरेथॉनला चालना देण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, पी. व्ही. स्नेहा यांच्यासह शहरातील अधिकारी उपस्थित होते. विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.