समता आश्रमशाळेचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम
उमदी :
उमदी ता.जत येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज समतानगर येथील शाखा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत असुन दिनांक ३ ते ५ तारखेपर्यंत सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यासाठी अनेक सामाजिक, राजकीय व अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती चेअरमन महादेवप्पाण्णा होर्तीकर यांनी दिली.
यावेळी बोलताना चेअरमन होर्तीकर म्हणाले की, कै.राजारामबापु व अँड.बोर्गीकर यांच्या प्रेरणेतून कै.काॅम्रेड कल्लाप्पाण्णा होर्तीकर यांनी जत सारख्या दुष्काळी भागात शैक्षणिक क्रांती व्हावी या उद्देशाने सर्वोदय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सन १९७४ साली समता आश्रमशाळेची स्थापना केली व आज या शाखेला ५० वर्षे पूर्ण होत असुन यावर्षी दिनांक ३ ते ५ असा तीन दिवस सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी ३ रोजी कणेरी मठाचे मठाधिपती जगतगुरु कांड सिद्धेश्वर महास्वामी, आमदार गोपीचंद पडळकर व आमदार रोहीत पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत. दिनांक ४ रोजी माजी मंत्री जयंतराव पाटील, खासदार निलेश लंके व खासदार विशाल दादा पाटील यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर शेवटी दिनांक ५ रोजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सलग तीन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या वेळी आदर्श सेवक सत्कार, रात्री विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चेअरमन महादेवपण्णा होर्तीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी व्हाईस चेअरमन रेवाप्पाण्णा लोणी, संचालक अँड.चन्नाप्पाण्णा होर्तीकर, प्राचार्य सुभाष होर्तीकर, मुख्याध्यापक सुरेश बगली उपस्थित होते.