For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गोल्डन कार्ड’च्या उद्दीष्टपूर्तीमध्ये कोल्हापूर राज्यात ‘भारी’! दैनंदिन, साप्ताहिक उद्दीष्टपूर्तीत कोल्हापूर आघाडीवर

11:21 AM Dec 23, 2023 IST | Abhijeet Khandekar
‘गोल्डन कार्ड’च्या उद्दीष्टपूर्तीमध्ये कोल्हापूर राज्यात ‘भारी’  दैनंदिन  साप्ताहिक उद्दीष्टपूर्तीत कोल्हापूर आघाडीवर
Golden Card Kolhapur
Advertisement

दररोज काढली जात आहेत 33 ते 37 हजार गोल्डन कार्ड; कार्डधारकांना वार्षिक 5 लाखांपर्यंतचे मिळणार मोफत उपचार; 1 हजार 209 आजारांवरती मिळणार उपचार

कृष्णात चौगले कोल्हापूर

आयुष्यमान भारत- प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत गोल्डन कार्ड काढण्याच्या दैनंदिन, साप्ताहिक उद्दिष्टपूर्तीमध्ये कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर स्थित आहे. डिसेंबर महिन्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात 13 व्या स्थानावरून 5 व्या क्रमांकावर आला आहे. या महिन्यात कोल्हापूर जिह्याचे एकूण काम 19 टक्केवरून 36 टक्के झाले आहे. तर तालुका निहाय काम 14 टक्केवरून 29 टक्के झाले आहे. दररोज साधारण 33 ते 37 हजार गोल्डन कार्ड काढले जात आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास 5 लाखापर्यंत 1 हजार 209 आजारांवरती मोफत उपचार दिले जात आहेत.

Advertisement

भारत सरकारने सप्टेंबर 2018 मध्ये आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनांची सुरुवात केली. सर्वात गरीब आणि असुरक्षित लोकसंख्येवरील आरोग्य विषयक खर्च कमी करणे आणि त्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ च्या माध्यमातून भारताच्या प्रगतीला गती देण्यासाठी, प्रत्येक पात्र कुटुंबासाठी वार्षिक 5 लाख रूपयांपर्यंत दुय्यम व तृतीयक स्तरावरील सार्वजनिक व संलग्नीत खाजगी रुग्णालयांच्या नेटवर्कद्वारे आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महत्वाकांक्षी योजना केंद्र व राज्य शासनाद्वारे आपल्या राज्यात राबवली जात आहे.

जिह्यातील 56 खासगी व 9 सरकारी रूग्णालयात मिळतात उपचार
या योजनेत अंगीकृत असलेल्या रुग्णालयात गोल्डन कार्ड धारकास 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहेत. कोल्हापूर जिह्यात एकूण 56 खासगी व 9 सरकारी रुग्णालय असे एकूण 65 रुग्णालये अंगीकृत आहेत. या रूग्णलायांमध्ये मोफत उपचार मिळत आहेत. आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यास ‘गोल्डन ई कार्ड’ काढणे महत्वाचे आहे. हे कार्ड लाभार्थ्यास स्वत:चे रेशन कार्ड, आधार कार्ड घेऊन आशा वर्कर्स, कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार केंद्र, रुग्णालयातील आरोग्य मित्र यांच्याकडे जाऊन काढता येईल. तसेच अॅड्रॉईड मोबाईलवरून अॅपद्वारे स्वत: लाभार्थीही हे कार्ड काढू शकतो.

Advertisement

मोफत उपचारासाठी कोल्हापूर जिह्यातील अंगीकृत रुग्णालये (खासगी व शासकीय)
अलायन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, इचलकरंजी, अनिश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कुरुंदवाड, अॅपल हॉस्पिटल, कोल्हापूर शहर, अॅस्टर आधार, कोल्हापूर, अथायू हॉस्पिटल, उजळाईवाडी, बारदेस्कर हॉस्पिटल गडहिंग्लज, केअर हॉस्पिटल, कोरोची, कॉन्टाकेअर नेत्ररूग्णालय, कोल्हापूर शहर, देसाई हॉस्पिटल, गडहिंग्लज, धर्मराज हॉस्पिटल, कळे, डायमंड हॉस्पिटल, कोल्हापूर, डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर, गंगा प्रकाश हॉस्पिटल, कोल्हापूर, जेम हॉस्पिटल, कोल्हापूर, गिरीजा हॉस्पिटल, पेठवडगाव, हत्तरकी हॉस्पिटल, गडहिंग्लज, हिरेमठ हॉस्पिटल, जयसिंगपूर, ऱ्ह्दय मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हेरले, इंदिरा गांधी हॉस्पिटल, इचलकंरजी, जोशी हॉस्पिटल, कोल्हापूर, कै, गुंडू पाटील हॉस्पिटलनरेवाडी-गडहिंग्लज, कामते हॉस्पिटल, गडहिंग्लज, के.एल.ई कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव, कै.एल.ई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल, बेळगाव, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, कोल्हापूर इस्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स, कोल्हापूर, के.पी.सी. हॉस्पिटल, कोल्हापूर, कुडाळकर हॉस्पिटल, पेठवडगाव, कै. केदारी रेडेकर हॉस्पिटल, गडहिंग्लज, मगदूम एंडो सर्जरी, कोल्हापूर, माहेर हॉस्पिटल, आजरा, माने केअर हॉस्पिटल, जयसिंगपूर, साई कार्डियाक सेंटर, कोल्हापूर, मोरया हॉस्पिटल, कोल्हापूर, ओमसाई ऑन्कोसर्जरी हॉस्पिटल, कसबा बावडा, पायोस हॉस्पिटल, जयसिंगपूर, सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर, रामकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट भोगावती-राधानगरी, ग्रामीण रूग्णालय, मलकापूर, ग्रामीण रूग्णालय, राधानगरी, सचिन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर, संजिवन हॉस्पिटल आणि क्रिटीकल केअर युनिट, जयसिंगपूर, संजिवन मल्टिस्पेसालिटी हॉस्पिटल, बोरपाडळे-पन्हाळा, संत गजानन महाराज ग्रामीण रूग्णालय महागाव-गडहिंग्लज, संत गजानन महाराज ग्रामीण रूग्णालय (कॅन्सर), चिंचेवाडी-गडहिंग्लज, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, कोल्हापूर, उपजिल्हा रूग्णालय गांधीनगर, उपजिल्हा रूग्णालय, कोडोली, उपजिल्हा रूग्णालय, सेवा रूग्णालय, कसबा बावडा, उपजिल्हा रूग्णालय, गडहिंग्लज, निरामय हॉस्पिटल, इचलकरंजी, शरण्या हार्ट केअर नर्सिंग होम, कोल्हापूर, शतायु मल्टिस्पेसालिटी हॉस्पिटल, शिरोळ, सिद्धीविनायक हार्ट फौंडेशन, कोल्हापूर, सिद्धगीरी रुग्णालय, कणेरी, सिद्धिविनायक नर्सिंग होम, कोल्हापूर, सनराईज हॉस्पिटल, कोल्हापूर, स्वराज्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, गडहिंग्लज, स्वस्तिक हॉस्पिटल, कोल्हापूर, व्हिजन हॉस्पिटल, कोल्हापूर, वारणा इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजी, कोल्हापूर, यशोदा हॉस्पिटल, बांबवडे, यशवंत धर्मार्थ, रूग्णालय, कोडोली, निरामय नर्सिंग होम, कोल्हापूर, सुरेश देशपांडे हॉस्पिटल, गडहिंग्लज.

नागरीकांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा
जिह्यात आयुष्यमान भारत- प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत गोल्डन कार्ड काढण्याची प्रक्रिया गतीने सुरु आहे. त्यामुळे नागरीकांनी हे कार्ड काढून घेऊन मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. ग्रामीण भागातील अनेक नागरीकांच्या आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसल्यामुळे हे कार्ड काढण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ज्यांच्या आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसेल त्यांनी तो तत्काळ लिंक करून घेऊन गोल्डन कार्ड काढावे.
डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.कोल्हापूर.

Advertisement
Tags :

.