For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एमएसडीएफ संघाकडे गोल्डन बेबी चषक

10:39 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
एमएसडीएफ संघाकडे गोल्डन बेबी चषक
Advertisement

संग्राम गुरव उत्कृष्ट गोलरक्षक तर अनिकेत पाटील बचावपटू

Advertisement

बेळगाव : धारवाड जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित गोल्डन बेबी लिग 10 वर्षांखालील आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एम.एस.डी.एफ. बेळगाव संघाने भटकळ एफसी संघाचा 2-0 असा पराभव करुन चषक पटकाविला. धारवाड येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात एमएसडीएफ बेळगाव संघाने सीबीएससी संघाचा 3-0 असा पराभव केला. सामन्याच्या 14 व्या मिनीटाला एमएसडीएफच्या श्रेयश भंडारीच्या पासवर अदानने गोल करुन 1-0 अशी आघाडी करुन दिली. 58 व्या मिनीटाला वरुण पुजारीच्या पासवर अनिकेत पाटीलने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 36 व्या मिनीटाला अनिकेतच्या पासवर श्रेयश भंडारीने तिसरा गोल करुन 3-0 ची आघाडी मिळवून दिली. उपांत्यपूर्व सामन्यात एमएसडीएफ संघाने बीआयएफए ब संघाचा 5-0 असा पराभव केला. या सामन्यात वरुण पुजारी, अनिकेत पाटील, युसीफ खलीफा यांनी प्रत्येकी एक तर अदानने दोन गोल केले.

उपांत्य फेरीच्या सामन्यात एमएसडीएफने सेंट जोसेफ संघाचा 2-0 असा पराभव केला. सामन्याच्या 17 व्या मिनीटाला अनिकेतच्या पासवर अदानने पहिला गोल केला तर दुसऱ्या सत्रात 33 व्या मिनीटाला युसूफ खलीफाच्या पासवर अदानने दुसरा गोल करुन 2-0 अशी आघाडी मिळवून देवून संघाला अंतिम फेरीत पाठविण्यास सिंहाचा वाटा उचलला. अंतिम सामन्यात एमएसडीएफने भटकळ संघाचा 2-0 असा पराभव केला. सामन्याच्या 23 व्या मिनीटाला श्रेयश भंडारीच्या पासवर अदानने गोल करुन 1-0ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 39 व्या मिनीटाला वरुण पुजारीच्या पासवर अनिकेत पाटीलने दुसरा गोल करुन 2-0 आघाडी मिळवून देवून विजय मिळविला. यावेळी भटकळ संघाला गोल करण्यात अपयश आले.  सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या एमएसडीएफ व उपविजेत्या भटकळ संघाला चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून संग्राम गुरव तर उत्कृष्ट डिफेंडर म्हणून अनिकेत पाटील यांना चषक देवून गौरविण्यात आले. या संघाला प्रशिक्षक मानस नायक यांच्या बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.