कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्मरण, चिन्मय, अर्णव, वैजनाथ यांना सुवर्ण

10:14 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय जलतरण स्पर्धा

Advertisement

बेळगाव : लखनौ येथे  केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद क्लबच्या जलतरपटुनी घवघवीत यश संपादन करताना 7 सुवर्ण, 3 रौप्य  व 1 कास्यसह एकूण 11 पदके संपादन केली. यामध्ये 19 वर्षाखालील गटात  कुमार स्मरण मंगळूरकर (के वी 2) याने 1500 मीटर फ्रीस्टाईल, 200 मीटर ब्रेस्टस्ट्रोक,  200 मीटर बटरफ्लायमध्ये प्रथम क्रमांकासह तीन सुवर्ण पदके संपादन केली. चिन्मय बागेवाडी (केंद्रीय विद्यालय 3) याने 17 वर्षे खालील गटात 4×100 मीटर मिडले रिले मध्ये सुवर्ण, 50 मीटर बॅकस्ट्रोक रौप्य  व 100 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये कांस्यपदक संपादन केले. वैजनाथ सोनपनावार (केंद्रीय विद्यालय 2) याने 14 वर्षाखालील गटात 4×100 मीटर फ्री स्टाईल  व 4×100 मीटर मिडले रिले मध्ये दोन सुवर्ण पदके पटकाविली.  अर्णव कुलकर्णी ( के वी 2 ) याने 17 वर्षाखालील गटात 1 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग स्पर्धेत 1 सुवर्ण, 3 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग व हायबोर्ड डायव्हिंग मध्ये दोन रौप्य पदके संपादन केली. वरील सर्व जलतरणपटूंना आबा व  हिंद क्लबचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, शिवराज मोहिते, अमित जाधव, संदीप मोहिते यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभते तर क्लबचे अध्यक्ष अरविंद संगोळी, शितल हुलबत्ते, अॅड. मोहन सप्रे, शुभांगी मंगळूरकर तसेच केवी 2 प्राचार्य महेंद्र कालरा, केवी 3 प्राचार्य  अनिल कुमार, क्रीडाशिक्षक मोहन गावडे व  महेंद्र कांबळे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.  स्मरण, चिन्मय, अर्णव यांची पुढील महिन्यात होणाऱ्या एस जी एफ आय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे .

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article