गुडघ्यांमध्ये दिसून आल्या सोन्याच्या तारा
गुडघेदुखीचे कारण आले समोर
दक्षिण कोरियात एका 65 वर्षीय महिलेच्या गुडघेदुखीने डॉक्टरांनाच हैराण केले आहे. तिच्या एक्स-रेमध्ये शेकडो सोन्याच्या तारा दिसून आल्या. महिलेला ऑस्टियोआर्थराइटिसच्या वेदना होत्या, परंतु या तारा अॅक्यूपंक्चर ट्रीटमेंटचा हिस्सा होत्या. 65 वर्षीय महिलेला अनेक वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास होता, डॉक्टरांनी याला ऑस्टियोआर्थराइटिसचे निदान केले होते. हा एक असा आजार आहे, ज्यात गुडघ्यांच्या कार्टिलेजचे घर्षण होत वेदना होऊ लागतात, महिलेने प्रथम वेदनाशामक औषधे आणि स्टेरॉइड इंजेक्शन घेतले, परंतु वेदना कमी झाल्या नाहीत, तर औषधांमुळे पोटदुखी सुरू झाली, मग तिने पर्यायी उपचार म्हणून
अॅक्यूपंक्चर सुरू केले. महिलेने आठवड्यात अनेकदा अॅक्यूपंक्चर करविले, खासकरून वेदना अधिक असताना तिने हे करविले होते. परंतु वेदना अधिक झाल्यावर ती रुग्णालयात गेली, डॉक्टरांनी गुडघ्याचा एक्स-रे काढला असता, चकित करणारे दृश्य दिसून आले. गुडघ्याचे हाड (शिनबोन आणि थाईबोन) जाड अन् कडक झाले होते, तेथे बोनी स्पर्स हेते, परुंत सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे शेकडो छोट्या छोट्या सोन्याच्या तारा गुडघ्याच्या आसपास दिसल्या. या तारा अॅक्यूपंक्चरचा हिस्सा होत्या, असे
डॉक्टरांना चौकशीनंतर कळले. हे गोल्ड-थ्रेड अॅक्यूपंक्चर तंत्रज्ञान होते, ज्यात छोट्या, स्टराइल सोन्याच्या तारा जाणूनबुजून टिश्यूमध्ये सोडल्या जातात, जेणेकरून सातत्याने स्टिम्युलेशन मिळेल. आशियात ऑस्टियोआर्थराइटिस आणि रुमेटॉयड आर्थराइटिससाठी हा प्रकार सामान्य आहे. या तारा काढण्यात आल्या की नाही, हे स्पष्ट नाही. परंतु हा प्रकार जोखिमयुक्त आहे. तारांमुळे सिस्ट (गाठी) निर्माण होऊ शकतात, तसेच त्या शरीरात दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतात. एका 75 वर्षीय महिलेच्या पाठीत टाकण्यात आलेल्या तारा 10 वर्षांनी पायात उतरल्या होत्या, त्यामुळे सेलुलायटिस (त्वचेचे गंभीर इफेक्शन) झाले होते.