महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमित पांघल, सचिन सिवाच यांना सुवर्णपदके

06:38 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्ट्रँडजा मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धा : निखत झरीन, अरुंधती चौधरी रजत, बरुण सिंग यांनी रौप्य, भारताला एकूण 8 पदके

Advertisement

वृत्तसंस्था/ सोफिया, बल्गेरिया

Advertisement

वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पदकविजेता अमित पांघल व सचिन सिवाच यांनी येथे झालेल्या 75 व्या स्टँडजा मेमोरियल मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली तर निखत झरीन व अन्य तीन भारतीय मुष्टियोद्ध्यांनी रौप्यपदके मिळविली. भारताने या स्पर्धेत एकूण 8 पदके पटकावली, त्यात 2 सुवर्ण, 4 रौप्य व 2 कांस्यपदकांचा समावेश आहे.

2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविलेल्या अमित पांघलने 51 किलो वजन गटाच्या अंतिम लढतीत कझाकच्या सॅनझार ताश्केनबेचा 5-0 असा एकतर्फी पराभव करीत जेतेपद पटकावले. 57 किलो वजन गटाच्या अंतिम लढतीत सचिन सिवाचने उझ्बेकच्या शाखझोद मुझफरोनव्हवर 5-0 याच फरकाने विजय मिळवित सुवर्ण पटकावले. मागील वेळेस त्याने या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन fिनखत झरीन (50 किलो वजन गट) व अरुंधती चौधरी (66 किलो वजन गट), बरुण सिंग शांगोलशेम (48 किले गट) व रजत (67 किलो गट) यांना मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

पांघलने ताश्केनबेविरुद्ध जबरदस्त व अचूक ठोसेबाजी करीत एकतर्फी विजय मिळविला. 2017 मध्ये पांघलने कांस्य मिळविले होते तर 2018 व 2019 मध्ये लोगापाठ दोनदा सुवर्णपदके मिळविली होती. त्याने जॅब्स व डाव्या हाताचे हुक्सचा सढळ व अचूक वापर करीत अखेरपर्यंत वर्चस्व ठेवले. वेळ पुढे सरकेल तसे पांघलने जास्त आक्रमक फटकेबाजी करीत तिसरा राऊंड जिंकून विजय साकार केला. त्याने हे यश मिळविले असले तरी या महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत तो सहभागी होऊ शकणार नाही. त्याच्या जागी दीपक भोरियाला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

सचिनने अंतिम लढतीत स्थिर होण्यासाठी थोडा वेळ घेतला. दोघेही एकमेकांवर वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न करीत होते. पण पहिली फेरीत सचिनने 3-2 अशी जिंकली. आत्मविश्वास बळावल्याने त्याने आपल्या उंचीचा उपयोग करीत अचूक पंचेस मारत दुसरा व तिसरा राऊंड जिंकून विजय साकार केला.

निखत झरीन अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत उझ्बेकच्या 20 वर्षीय ज्युनियर आशियाई चॅम्पियन सबिना बोबोकुलोव्हाकडून पराभूत झाली. सबिनाने उपांत्य फेरीत आशियाई क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन वु यू हिला धक्का देत अंतिम फेरी गाठली होती. या लढतीच्या पहिल्या सहा मिनिटांत दोघींनी जबरदस्त खेळ केला. मात्र झरीन बचावात भक्कम होती तर सबिनाने प्रतिआक्रमणात निर्णायक ठोसेबाजी केली. सबिना बचावात भक्कम होती आणि डोकीच्या जलद हालचाली केल्यामुळे झरीनचे पंचेस तिच्यापर्यंत पोहोचतच नव्हते. पहिल्या दोन फेऱ्यांत पिछाडीवर पडल्यानंतर झरीनने शेवटच्या तीन मिनिटांत जोरदार प्रयत्न केले, अचूक ठोसेबाजी तिने ही फेरी जिंकली. पण एकंदर गुणांत सबिनाने बाजी मारली होती.

राष्ट्रीय विजेत्या अरुंधतीला चीनची विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन लियु यांगकडून 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. बरुण सिंगला अंतिम लढतीत किर्गीझच्या खोदझिएव्हअ अन्वरझानकडून 0-4 असा पराभव स्वीकारावा लागला तर उपांत्य फेरीत बाय मिळालेल्या रजतला कझाकच्या बेखबॉओव्ह दुलतकडून 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article