महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दीप्ती जीवनजीला विश्वविक्रमासह सुवर्णपदक

06:46 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कोबे (जपान)

Advertisement

येथे सुरु असलेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सोमवारी भारताची महिला धावपटू दीप्ती जीवनजीने महिलांच्या टी-20 400 मी. धावण्याच्या शर्यतीत नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकाविले.

Advertisement

महिलांच्या 400 मी. धावण्याच्या टी-20 प्रकारात दीप्ती जीवनजीने 55.07 सेकंदाचा अवधी घेत नवा विश्वविक्रम केला. तसेच तिने गेल्या वर्षी पॅरिस येथे झालेल्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत अमेरिकेच्या ब्रेना क्लार्कने नोंदविलेला 55.12 सेकंदाचा विश्वविक्रम मोडीत काढला. या क्रीडा प्रकारात तुर्कीच्या ओनडेरने 55.19 सेकंदाचा अवधी घेत. रौप्यपदक तर इक्वेडोअरच्या अँग्युलोने 56.68 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले.

पुरुषांच्या एफ 56 थाळीफेक प्रकारात भारताच्या योगेश कथुनियाने 41.80 मी. अंतर नोंदवित रौप्यपदक मिळविले. स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारताचे आतापर्यंत  4 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्यपदकांचा समावेश आहे. टी-47 पुरुषांच्या उंच उडीत निषाद कुमारने रौप्य तसेच टी-35 200 मी. धावण्याच्या शर्यतीत प्रिती पालने कांस्यपदक घेतले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article