For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तन्वी पत्रीला सुवर्णपदक

06:32 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
तन्वी पत्रीला सुवर्णपदक
Advertisement

वृत्तसंस्था/ चेंगडू

Advertisement

चीनमधील चेंगडू येथे सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप 15 आणि 17 वर्षाखालील वयोगटाच्या मुले आणि मुलींच्या स्पर्धेत भारताच्या तन्वी पत्रीने 15 वर्षाखालील मुलींच्या गटात एकेरीतील सुवर्णपदक पटकाविले.

भारताच्या टॉप सिडेड तन्वी पत्रीने अंतिम सामन्यात व्हिएतनामच्या द्वितीय मानांकित नेगुएनचा 22-20, 21-11 अशा सरळ गेम्समध्ये 34 मिनिटात फडशा पाडून सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत तन्वी पत्रीने सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकही गेम न गमाविता सुवर्णपदक मिळविले आहे. 2017 साली या स्पर्धेत भारताच्या सामीया इमाद फारुकी तसेच 2019 साली भारताच्या तसनीम मीरने सुवर्णपदके मिळवली होती. आता या यादीमध्ये तन्वी पत्रीचा समावेश झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.