For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्योती येराजीला सुवर्णपदक

06:27 AM Feb 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
ज्योती येराजीला सुवर्णपदक
Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान

Advertisement

आशियाई इनडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी भारताची नवोदित महिला धावपटू ज्योती येराजीने महिलांच्या 60 मी. अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने या क्रीडाप्रकारात 8.12 सें. अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले.

2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ज्योतीने 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत रौप्यपदक मिळविले होते. तसेच तिने या क्रीडा प्रकारात गेल्या वर्षी दर्जेदार कामगिरी करताना 8.13 सें. अवधी घेतला होता. तेहरानच्या स्पर्धेत ज्योतीने यापूर्वी नोंदविलेला स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. जपानच्या आसुकी तेरेडाने रौप्यपदक तर हाँगकाँगच्या लुई येयूने कास्यपदक मिळविले. हाँगझोयू येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत रौप्यपदक मिळविले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.