For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॅली बिस्नॉईला सुवर्णपदक

06:49 AM Aug 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
डॅली बिस्नॉईला सुवर्णपदक
Advertisement

वृत्तसंस्था / श्रीनगर

Advertisement

येथे आयोजित केलेल्या खेलो इंडियाच्या वॉटर स्पोर्ट्स महोत्सवात मध्यप्रदेशच्या 17 वर्षीय डॅली बिस्नॉईने महिलांच्या कायकिंग 500 मी. (के-1) प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. मध्यप्रदेशच्या स्पर्धकांनी या क्रीडा प्रकारात आपले पुर्ण वर्चस्व राखताना चारही सुवर्णपदक मिळविली.

महिलांच्या 500 मी. कायकिंग (के-1) प्रकारात बिस्नॉईने 2:11.093 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. या प्रकारात उत्तराखंडच्या पी. रोजीडेवीने रौप्य पदक मिळविताना 2:14.068 सेकंदाचा अवधी घेतला. केरळाच्या निकीता सरकारने 2:22.154 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले. मध्यप्रदेशच्या 14 वर्षीय निहारीका सिंग आणि चंद्रकला कुशवाह यांनी महिलांच्या कायकिंग 500 मी. (के-2) प्रकारात सुवर्णपदक घेतले. सुधीरकुमार आणि प्रिन्स गोस्वामी यांनी मध्यप्रदेशला पुरुषांच्या कॅनोईंग सी-टू प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. आदित्य सिंग आणि मनजित यांनी मध्यप्रदेशला पुरुषांच्या कायकिंग (के-2) प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. या क्रीडा स्पर्धेत मध्यप्रदेशने आपले वर्चस्व राखले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.