For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पृथ्वीच्या कोरमधून होतेय सोन्याची गळती

06:47 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
पृथ्वीच्या कोरमधून होतेय सोन्याची गळती
Advertisement

पृथ्वीचा कोर, जो आमच्या ग्रहाचा सर्वात खोलवरील हिस्सा आहे, तो सोने आणि अन्य मूल्यवान धातू ‘लीक’ करत असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले आहे. पृथ्वीचे 99.9 टक्के सोने याच्या केंद्रस्थानी आहे. हे हजारो किलोमीटर मोठ्या पर्वतांखाली आहे, काही धातू कोरमधून बाहेर पडत पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत असल्याचे नव्या अध्ययनातुन कळले आहे.

Advertisement

जर्मनीच्या गोटिंगेन विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी हवाई बेटाच्या ज्वालामुखीय पर्वतांचे अध्ययन केले. यात त्यांना रुथेनियम नावाचा एक मूल्यवान धातू मिळाला, जो केवळ पृथ्वीच्या कोर-मॅन्टल सीमेतून येऊ शकतो. ही सीमा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 2900 किलोमीटर खोलवर आहे. खरोखरच सोन्याचा शोध घेतल्याचे आम्हाला वाटल्याचे उद्गार वैज्ञानिक निल्स मेसलिंग यांनी काढले आहेत.

पृथ्वीची रचना

Advertisement

पृथ्वी मुख्यत्वे तीन आवरणांनी तयार झालेली आहे,

क्रस्ट : हे मधले आवरण असून जे खडकांनी निर्माण झालेले असून ग्रहाचा सर्वात मोठा हिस्सा आहे.

कोर : हे पृथ्वीचे केंद्र असून यात दोन हिस्से आहेत, बर्हिगत कोर हे वितळलेल्या धातूंचा समुद्र आहे, तर अंतर्गत कोर बहुतांश ठोस लोखडांने तयार झालेले आहे.

कोरमध्ये सोने, रुथेनियम आणि अन्य मूल्यवान धातू असून त्या पृथ्वीच्या निर्मितीपासून तेथे जमा आहेत.

हवाईमध्ये काय खास आहे?

वैज्ञानिकांनी हवाईच्या किलाउआ ज्वालामुखीय पर्वतांमध्sय रुथेनियमची तपासणी केली. हा रुथेनियम कोरमधून आल्याचे त्यांना कळले. याचा अर्थ कोरमधून काही धातू मॅन्टलच्या मार्गे पृष्ठभागापर्यंत पोहोचत आहेत. हे  मूल्यवान धातू बहुधा कोरमधूनच आलेले असण्याची शक्यता आहे.

शोध महत्त्वपूर्ण का?

पृथ्वीचे कोर तितके वेगळे नाही जितका पूर्वी विचार केला जात होता, असे अध्ययनातून स्पष्ट होते. कोरमध्ये तप्त पर्वत आणि धातू मॅन्टलच्या मार्गे वर येत आहेत. हवाईसारखे बेट याच पर्वतांमुळे निर्माण झाले आहेत, ज्यांना मॅन्टल प्लूम म्हटले जाते. हा प्लूम कोर-मॅन्टल सीमेपासून सुरु होतो आणि पृष्ठभागापर्यंत पोहोचतो, ज्यामुळे ज्वालामुखी निर्माण होतात. पृथ्वीचा कोर सोने आणि मूल्यवान धातू लीक करत आहे, हवाईचा ज्वालामुखी कोरमधून सामग्री पृष्ठभागापर्यंत येत असल्याचा पुरावा आहे. हा शोध पृथ्वीची रचना आणि हवाईसारख्या बेटांच्या निर्मितीविषयी अधिक माहिती प्रदान करणारा आहे. हा शोध केवळ पृथ्वीच्या कोरच्या रहस्यांची उकल करत नसून आमच्या ग्रहावर सोने आणि मूल्यवान धातू कोरपासून पृष्ठभागापर्यंतचा मोठा प्रवास करत असल्याचे दाखवून देतो. वैज्ञानिक आता पृथ्वीचा कोर आणि मॅन्टल परस्परांशी कसे जोडलेले आहेत यावर अध्ययन करणार आहेत.

Advertisement
Tags :

.