For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2023 मध्ये सोन्याच्या मागणीत झाली घसरण

06:22 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
2023 मध्ये सोन्याच्या मागणीत झाली घसरण
Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

ाdरवर्ष 2023 मध्ये भारतीयांनी सोन्याच्या मागणीमध्ये 3 टक्के इतकी घसरण नोंदविली आहे. कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये 747 टन इतक्या सोन्याची मागणी भारतीयांनी केली होती. जागतिक सुवर्ण परिषदेने (वर्ल्ड गोल्ड कौन्सील)ही माहिती दिली आहे. 2023 मध्ये सोन्याच्या दागिन्यांची मागणी 6 टक्के घसरुन 562 टन इतकी राहिली आहे. सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये 7 टक्के वाढ होऊन 145 टन इतक्या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात आली. स्थानिक पातळीवरती सोन्याच्या किंमती सदरच्या वर्षात 15 टक्के वाढलेल्या आहेत. 1 जानेवारीला 55 हजार 350 रुपये प्रती ग्रॅम इतका असणारा दर 31 डिसेंबरला 63 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला होता.

काय म्हणाले सोमसुंदरम....

Advertisement

भारतीयांना सोने खरेदीवर 3 टक्के वस्तू व सेवाकर (जीएसटी) भरावा लागतो.   दरम्यान वर्षभरात ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये उत्सवाच्या काळात सोन्याच्या मागणीमध्ये मोठी वाढ दिसून आली. याच काळामध्ये किंमतीमध्ये कपात झाली होती. मात्र डिसेंबरमध्ये पुन्हा सोन्याच्या किंमती वाढू लागल्या. परिणामी चौथ्या तिमाहीमध्ये दागिन्यांची मागणी 9 टक्के घसरल्याची माहिती जागतिक सोने परिषदेचे भारतीय विभागीय सीईओ सोमसुंदरम् पी. आर. यांनी दिली.

Advertisement
Tags :

.