झाडाच्या टोकदार पानांमध्ये सोन्याचा अंश
ख्रिसमस ट्रीवर चमकणारे सिल्वर अन् गोल्डचे दागिने आम्ही सर्वांनी पाहिले आहेत, परंतु प्रत्यक्षात स्प्रूसच्या झाडांच्या सुयांमध्ये (नीडल्स) सोने लपलेले असते हे तुम्हाला माहित आहे का? हे सोने छोट्या छोट्या कणांच्या (नॅनोपार्टिकल्स) स्वरुपात असते. फिनलंडच्या वैज्ञानिकांनी हे रहस्य खुले आहे. एका नव्या अध्ययनानुसार नॉर्वे स्प्रूसच्या नावाचे झाड बॅक्टेरियाच्या मदतीने मुळांद्वारे पाण्यासोबत सोन्याचे कण शोषून घेते. हा शोध अलिकडेच ‘एनव्हायरनमेंटल मायक्रोबायोम’ नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.
वैज्ञानिकांनी फिनलंडच्या उत्तर हिस्स्यातील किटिला खाणीनजीकच्या स्प्रूस झाडांवर संशोधन केले. ही खाण युरोपमधील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. टीमने 23 झाडांमधून 138 नीडल्सचे नमुने मिळविले. याचा निष्कर्ष चकित करणारा होता, चार झाडांच्या नीडल्समध्ये सोन्याचे नॅनोपार्टिकल्स मिळाले. हे कण इतके छोटे आहेत की एक मिलिमीटरचा लाखावा हिस्सा आहे. झाडांमध्ये असणारे बॅक्टेरिया आणि अन्य सुक्ष्मजीव सोने जमा करण्यास मदत करतात. या बॅक्टेरियांना एंडोफाइट्स म्हटले जाते. हे झाडांमध्ये राहणारे चांगले जीव असून ते झडांना हार्मोन तयार करण्यास आणि पोषक घटक शोधून घेण्यास मदत करतात अशी माहिती अध्ययनाच्या प्रमुख लेखिका कैसा लेहोम्सा यांनी दिली आहे. लेहोस्मा या फिनलंडच्या ओउलू विद्यापीठाच्या इकोलॉजिस्ट आहेत.
सोने कसा जमा होते?
झाड मूळांद्वारे पाणी शोषून घेते, मातीत मिसळलेले सोनेही पाण्यासोबत येते. परंतु सोने विषारी असते, याचमुळे झाड याला नीडल्समध्ये जमा करू इच्छित नाही, येथे एंडोफाइट बॅक्टेरिया कामी येतो. हा बॅक्टेरिया बायोमिनरलायजेशन प्रक्रियेद्वारे सोन्याच्या कणांना वेगळे करतो. बायोमिनरलाजेशनचा अर्थ जीव स्वत:च्या पेशींमध्ये खनिज तयार करतो किंवा नियंत्रित करतो. बॅक्टेरिया सोन्याच्या कणांना घेरून बायोफिल्म तयार करतो. हे बायोफिल्म शुगर किंवा प्रोटीनने निर्माण झालेली असते, जे बॅक्टोरियाला झाडाच्या आत सुरक्षित ठेवते. सोनेयुक्त नीडल्समध्ये बॅक्टेरियाची संख्या कमी होती असे अध्ययनात आढळून आले आहे. यात बी30बी-42, क्यूटिबॅक्टीरियम आणि कोरिनेबॅक्टीरियम सामील आहे. अन्य अध्ययनांमध्ये अधिक धातूयुक्त झाडांमध्ये बॅक्टेरियाची विविधता कमी असल्याचे दिसून आले. बॅक्टेरिया सोन्याला कमी विषारी करण्याचे काम करतात.
नीडल्समध्ये सोने इतके कमी आहे की झाड तोडून श्रीमंत होणे अशक्य आहे. परंतु हा शोध सोन्याच्या शोधासाठी अत्यंत उपयुक्त आहे. झाडांच्या पानांमध्ये असे बॅक्टेरिया शोधून सोन्याचे साठे शोधणे सोपे ठरणार आहे. हा बॅक्टेरिया स्क्रीनिंगद्वारे खाण कंपन्यांना मदत करू शकतो असे लेहोस्मा यांचे सांगणे आहे.
महत्त्वपूर्ण शोध
निसर्गात बॅक्टेरिया किती चमत्कारिक आहेत हे अध्ययन दर्शविते. झाड मातीतून धातू शोषून घेत पर्यावरण साफ ठेवते, यामुळे खाण उद्योगाला नवे तंत्रज्ञान मिळू शकते. तसेच छोटे जीव मोठे रहस्य उघड करू शकतात अशी शिकवण यातून मिळते.