सोनसाखळीने केले कोट्याधीश
````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````` ती कृती आपल्याला प्रचंड लाभ देऊन जाते. इतका, की कित्येकदा आपला विश्वासही बसत नाही. आपल्या अवतीभोवती अशी भाग्यवान माणसे वावरत असलेली आपण पहातो. सिंगापूर येथे वास्तव्यास असणाऱ्या बालसुब्रम्हणियम चिथंबरम यांच्या जीवनात असे घडलेले आहे.
त्यांनी काही काळापूर्वी आपल्या पत्नीसाठी एक सोन्याची साखळी विकत घेतली होती. ही साखळी आपला भाग्योदय करणार आहे, याची त्यांना त्यावेळी कल्पनाही नव्हती. त्यांनी ही साखळी 3 लाख 80 हजार रुपयांना विकत घेतली होती. मात्र, ती ज्या दुकानातून घेतली त्या दुकानाकडून प्रतिवर्ष एक लकी ड्रॉ काढला जातो. हा लकी ड्रॉ या दुकानात जे खरेदी करतात त्यांच्यासाठीच काढला जातो. यावर्षी या लकी ड्रॉचे विजेते बालसुब्रम्हणियम हे ठरले. त्यांना पुरस्कार म्हणून तब्बल 8 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. ते मूळचे भारतीयच असून गेल्या 21 वर्षांपासून सिंगापूर येथे वास्तव्यास आहेत. तेथे त्यांना चांगली नोकरीही आहे. ज्या दिवशी त्यांना हा पुरस्कार मिळाला ती त्यांच्या पित्याची चौथी पुण्यतिथी होती. त्यामुळे ते ही लॉटरी लागल्याचे श्रेय आपली पत्नी आणि पित्याच्या स्मृतीला देतात.