गोकूळची उत्पादने सौंदती डोंगरावर उपलब्ध ! दूध, दूग्धजन्य पदार्थांचे वाहन रवाना : ओढ्यावरील रेणुका मंदिर येथे वाहनाचे पुजन
गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ सौंदतीकडे घेवून जाणाऱ्या वाहनाचे पुजन करताना अध्यक्ष अरुण डोंगळे सोबत उपस्थित अन्य मान्यवर
कोल्हापूर प्रतिनिधी
सौंदती येथे होणाऱ्या रेणुका यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात भाविका जातात. या भाविकांना पूजा, नैवद्य यासाठी गोकुळने सौंदती डोंगरावर दूध व दूग्धजन्य पदार्थ उपलब्ध करुन दिले आहेत. शुक्रवारी ओढ्यावरील रेणुका मंदीर येथे गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थ असलेल्या वाहनाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यानंतर हे वाहन सौंदती डोंगराकेडे रवाना झाले.
बेळगाव जिह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा 22 ते 26 डिसेंबर दरम्यान होत आहे. या यात्रेसाठी लाखो भाविक येत असतात. कोल्हापूर जिल्ह्यातुनही मोठयाप्रमाणात भाविक यात्रेसाठी जातात. यात्रा काळात पूजाअर्चा, चहा पाणी, नैवेद्यासाठी गोडधोड प्रसाद हे नित्यनेमाचे कार्यक्रम होत असतात. यासाठी गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थाची आवश्यकता असते. गतवर्षी प्रमाणे याही वर्षी गोकुळमार्फत यात्रेकरूंसाठी यात्रा कालावधीत सौंदत्ती येथे गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.
यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, अशोक पुणेकर, संतोष पाटील, रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष किरण मोरे, सुरेश बिरबोळे, प्रशांत खाडे, श्रीकांत कारंडे, संजय मांगलेकर, विजय पाटील, उदय पाटील, बाबुराव पाटील, सुनिल मोहिते, प्रदीप साळोखे, अच्युतराव साळोखे, मोहन साळोखे आदी उपस्थित होते.
फोटो ओळ सौंदत्ती यात्रेनिमित्त गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेऊन जाण्राया गाडीचे पूजन करताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, अशोक पुणेकर,संतोष पाटील,श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त मंडळ अध्यक्ष किरण मोरे, सुरेश बिरबोळे, प्रशांत खाडे, श्रीकांत कारंडे, संजय मांगलेकर,विजय पाटील, उदय पाटील,बाबुराव पाटील, सुनिल मोहिते,प्रदीप साळोखे, अच्युतराव साळोखे, मोहन साळोखे, चव्हाण, सरनाईक सेवा संघटनेचे पदाधिकारी व भाविक आदी दिसत आहेत.