टेटे स्पर्धेत गोगटेला उपविजेतेपद
10:54 AM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : निधीगुंडी येथे एम. व्ही. नागथन कॉलेज आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत एम. व्ही. नागथन कॉलेज बेळगावच्या गोगटे महाविद्यालया पराभव करून विजेतेपद पटकाविले तर गोगटेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत 8 महाविद्यालय संघांनी भाग घेतला होता. अंतिम सामन्यात एम. व्ही. नागथन कॉलेजने गोगटे महाविद्यालयचा 2-1 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. गोगटे उपविजेत्या संघाला महाविद्यालयाचे चेअरमन ए. के. तगारे, आर. एस. मुतालिक देसाई, प्राचार्य डॉ. वेणूगोपाल जालीहाळ, डॉ. अस्मिता देशपांडे, जिमखाना चेअरमन अश्विनी जोशी यांचे प्रोत्साहन मिळत असून व क्रीडा निर्देशक नम्रता अंतिलमरद यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Advertisement
Advertisement