गोगटे, संगोळ्ळी रायण्णाकडे धनंजय पटेल चषक
12:21 PM Nov 28, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
अंतिम सामन्यात संगोळ्ळी रायण्णा संघाने गोगटे संघाचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात 11, 13, 23 व्या मिनिटाला संगोळ्ळी रायण्णाच्या बापुल आलोजीने सलग तीन गोल करुन स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक नोंदविली. 28 व्या मिनिटाला गोगटेच्या विवेकने गोल करुन 1-3 अशी आघाडी कमी केली. 34 व्या मिनिटाला बापुलने चौथा गोल करुन संघला 4-1 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात गोगटे संघाला आणखी गोल करण्यात अपयश आले. महिलांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आरपीडी संघाने संगोळ्ळी रायण्णा संघाचा 1-0 असा निसटता पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात गोगटेने आरपीडीवर 1-0 असा निसटता विजय मिळविला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण यश आले नाही. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 26 व्या मिनिटाला गोगटेच्या सारा शिंदेच्या पासवर अमृताने गोल करुन 1-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात आरपीडी संघाला गोल करण्यात अपयश आले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते धनंजय पटेल, गणपत कडोलकर, संघटनेचे सचिव साकीब बेपारी, एन. बी. नदाफ, एम. जे. तेरणीकर, गोपाळ खांडे, उत्तम शिंगे, इक्बाल बॉम्बेवाले आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संगोळ्ळी रायण्णा व गोगटे संघाला तर उपविजेत्या गोगटे व आरपीडी संघाला चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्प़ृष्ट खेळाडू बापुल आलोजी व सारा शिंदे यांना चषक देवून गौरविण्यात आले. पंच म्हणून साकिब बेपारी, उत्तम शिंदे, इरफान बागवान व शाबाद नाईक यांनी काम पाहिले.
Advertisement
आंतर महाविद्यालयीन एकदिवशीय हॉकी स्पर्धा : बापुल आलोजी व सारा शिंदे उत्प़ृष्ट खेळाडूचे मानकरी
Advertisement
बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित धनंजय पटेल पुरस्कृत धनंजय पटेल चषक एकदिवशीय आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुरुष गटात संगोळ्ळी रायण्णा संघाने गोगटे संघाचा तर महिलांच्या गटात गोगटे संघाने आरपीडी संघाचा पराभव करुन धनंजय पटेल चषक पटकाविला. बापुल आलोजी व सारा शिंदे यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित एकदिवशीय आंतरमहाविद्यालयीन धनंजय पटेल पुरस्कृत हॉकी स्पर्धेत पुरुष गटात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गोगटे संघाने आरपीडी संघाचा 2-1 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.
Advertisement
Advertisement
Next Article