गोगटे ग्रुपच्या ‘शिरीश गार्डन्स’चे उद्घाटन थाटात
बेळगाव : गोगटे ग्रुपने गोगटे प्लाझा येथे साकारलेल्या नूतन ‘शिरीश गार्डन्स’चे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. 27 हजार चौरस फूट क्षेत्रामध्ये असणारे हिरवेगार लॉन आणि आकर्षक इनडोअर हॉलचा हा सुंदर मिलाफ असून लग्न, रिसेप्शन, पार्टी किंवा कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी अतिशय योग्य असे स्थळ आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रसिद्ध गायक राहुल रानडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह संगीत मैफल सजवली. शिरीश गार्डनसह आम्ही असे एक ठिकाण तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे वैयक्तिक पण प्रिमियम वाटेल. लँडस्केपिंगपासून आतील सजावटीपर्यंत प्रत्येक पैलू उत्सवी आणि संस्मरणीय बनविण्यासाठी त्याचे डिझाईन करण्यात आले असल्याचे गोगटे ग्रुपच्यावतीने सांगण्यात आले. फेअरफिल्ड बाय मॅरिएट आणि दोन रेस्टॉरंटसह असलेल्या या कॉम्प्लेक्समध्ये आता कार्यक्रमासाठी बुकिंग सुरू झाले असून शिरीश गार्डन हे वेगवेगळ्या इन्व्हेंटसाठी आणि लग्नसमारंभासाठी आकर्षण ठरणार आहे.