कोलकाता येथे गोदरेज 53 एकरमध्ये प्रकल्प उभारणार
भव्य निवासी प्रकल्प होणार असल्याची माहिती
नवी दिल्ली :
बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने कोलकात्यात सुमारे 500 कोटी रुपयांची कमाई क्षमता असलेल्या प्रकल्पासाठी 53 एकर जमीन संपादित केली आहे. गोदरेज प्रॉपर्टीज ही भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक आहे.
कंपनीने बुधवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की, कोलकाता येथील जोका येथे जवळपास 53 एकर जमीन घेतली आहे. ‘प्रस्तावित प्रकल्पामध्ये 13 लाख चौरस फूट विक्री योग्य क्षेत्राची विकास क्षमता असल्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने निवासी भूखंडांच्या विकासाचा समावेश आहे. त्यातून अंदाजे कमाई 500 कोटी रुपयांची होण्याचा अंदाज आहे.
गोदरेज प्रॉपर्टीजचे सीईओ गौरव पांडे यांनी, हे भूसंपादन भारतातील प्रमुख शहरांमध्ये आमची उपस्थिती वाढवण्याच्या आमच्या धोरणाशी सुसंगत आहे. जोकामध्ये एक उत्कृष्ट भूखंड विकास प्रकल्प तयार करणे हे आमचे ध्येय असल्याचे म्हटले आहे.