कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोदरेज प्रॉपर्टीजला चांगल्या महसुलाची आशा

06:02 AM Apr 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड यांनी आर्थिक वर्ष 2025 मध्ये विविध शहरांमध्ये प्रकल्पांच्या माध्यमातून चांगला महसूल प्राप्त केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. एनसीआर विभागातून कंपनीला 36 टक्के, बेंगळूरने 17 टक्के आणि एमएमआर विभागातून 27 टक्के इतका महसूल प्राप्त झाला आहे.

Advertisement

पुणे, हैदराबाद आणि इतर शहरांनी 20 टक्के इतका महसूल गोदरेज प्रॉपर्टीला प्राप्त करून दिला आहे. कंपनीचे मुंबईसह राष्ट्रीय राजधानी विभाग, बेंगळूर आणि पुणे या ठिकाणी बांधकाम प्रकल्प आधीपासूनच कार्यरत आहेत. आर्थिक वर्ष 2025 मध्ये विक्री बुकिंगच्या माध्यमातून 9 टक्के अधिक रक्कम प्राप्त केली आहे. त्याचप्रमाणे व्यवसायाचा विकाससुद्धा जवळपास 32 टक्के राहिला असल्याची माहिती आहे.

15 हजार कोटी केले प्राप्त

कंपनीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये 15 हजार कोटी रुपये प्राप्त केले असल्याची माहिती असून 1.5 कोटी चौरसफुटच्या जागेची विक्री केल्याचेही सांगितले जात आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीमध्ये बुकिंगच्या माध्यमातून 10,200 कोटी रुपये प्राप्त केल्याचे म्हटले जाते. सदरच्या कालावधीमध्ये कंपनीने 15,302 घरांची विक्री केली आहे.

या शहरात ग्राहकांचा प्रतिसाद

गोदरेज कंपनीने  एनसीआर, हैदराबाद, मुंबई आणि बेंगळूरमधील राबवलेल्या नव्या प्रकल्पांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला असल्याचे दिसून आले आहे.

जमीन खरेदीवर जोर

आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी कंपनीने अलीकडे विविध शहरांमध्ये जमीन खरेदीवर जास्त भर दिला आहे. या येणाऱ्या काळामध्ये या जागांवरती नवे प्रकल्प उभारण्याची योजना कंपनी बनवत आहे.

निर्यातीत आयफोन्स, लॅपटॉप चीनपेक्षा 20 टक्के स्वस्त

नवी दिल्ली : भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या लॅपटॉप, टॅब्लेटस् आणि आयफोन्सच्या किंमती तेथील बाजारात चीनमधील उत्पादनांच्या तुलनेत 20 टक्के कमी असतील, असे म्हटले जात आहे. अमेरिकेने काही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर आयात शुल्कात सवलत देण्याचे मान्य केल्याने आयफोन्स 20 टक्के चीनपेक्षा स्वस्त उपलब्ध होतील. शनिवारी अमेरिकेने घोषणा करताना स्मार्टफोन्स, लॅपटॉप, टॅब्लेटस् व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंवरील अतिरीक्त कर काढून घेण्याचे म्हटले आहे. यातूनच भारत व व्हिएतनामला शुल्काचा लाभ पोहचणार असून यांच्या वस्तु चीनपेक्षा अमेरिकेत 20 टक्के स्वस्त मिळू शकणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्याबाबतीत पाहता भारतात अॅपल, फॉक्सकॉन व डिक्सन यांचा समावेश आहे. वरील निर्णयाचा फायदा अॅपलला होऊ शकतो. 2024-25 मध्ये भारतातून 2 लाख कोटींचे मोबाईल फोन्स निर्यात केले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article