कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोदरेज प्रॉपर्टीजने मिळवले एकाच प्रकल्पात 2 हजार कोटी

06:58 AM Jun 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूरात पहिल्या टप्प्यात कमावली रक्कम

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

Advertisement

बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज यांनी बेंगळूरमध्ये एका प्रकल्पात 1450 फ्लॅटस्ची विक्री करत 2 हजार कोटी रुपये प्राप्त केले असल्याचे समजते. या भागात प्रिमीयम गटातील घरांना मागणी सातत्याने वाढीव राहिली आहे.   सोमवारी कंपनीने यासंबंधीची माहिती शेअरबाजाराला दिली आहे.

बेंगळूरजवळील देवनहळळीतील गोदरेज एमएसआर सिटी प्रकल्पात पहिल्या टप्यात 2000 कोटी रुपये फ्लॅट विक्रीतून मिळवले आहेत. एप्रिल 2025 मध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता. सदरच्या प्रकल्पात 1450 फ्लॅटस्ची विक्री करण्यात आली आहे. हा टाऊनशिपचा प्रकल्प एकंदर 56 लाख चौ. फू. क्षेत्रफळात होणार आहे. गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ गौरव पांडे म्हणाले की, जीवनशैली, संपर्क व्यवस्थेच्या सोयीसह उत्तम डिझाइनच्या आमच्या प्रकल्पांप्रती ग्राहकांचा विश्वास अधिकाधिक वाढतो आहे. पुढच्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ आढावा घेतल्यानंतर केला जाणार असल्याचे ते म्हणाले. देशातील आघाडीवरची कंपनी म्हणून गोदरेज प्रॉपर्टीजचा आवर्जून उल्लेख केला जातो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article