महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उद्धवाला भगवंतानी बद्रिकाश्र्रमात पाठवले

06:08 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

उद्धवाने मुक्तीनंतरची भक्ती मागितली आणि भगवंतानी त्याला ती दिल्याबरोबर श्रीकृष्णाच्या अवतारातली मायेचे नियंत्रण करण्याची शक्ती उद्धवाच्या हातात आपसूकच आली. ही मायेचे नियंत्रण करणारी शक्ती उद्धवाला श्रीकृष्णांनी आपणहून दिली होती. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने ह्याचा प्रत्यय उद्धव घेत होता. त्याला देवांच्या अवतार कार्यात ते वापरत असलेल्या शक्तीपेक्षा कितीतरी जास्त शक्ती प्राप्त झाली. भगवंत पुढे म्हणाले, उद्धवा, बुद्धिबळाच्या खेळात काहीही पूर्वपुण्याई नसताना राजा, प्रधान, शिपाई तयार होतात. बघायला गेलं तर सर्व सोंगट्या एकाच लाकडापासून तयार केलेल्या असतात. एकाच लाकडापासून तयार झालेल्या असल्याने कोण कुणाचे वैरी असणार? तरीही त्या निर्जीव सोंगट्या एकमेकांशी झुंजत असतात, मारामारी करत असतात. खरं बघितलं तर हे सर्व अज्ञानाच्या पोटी होत असतं. निर्जीव वस्तूला सजीव समजणे हेच मुळी वेडेपणाचे आहे. सर्वच सोंगट्या मेल्यानंतर त्यातल्या कुणाला तरी वैकुंठ प्राप्त होतो का किंवा कुणी नरकात जातं का? तेव्हा या सोंगट्या बद्ध आहेत किंवा मुक्त झाल्या असे म्हणणे केवळ मिथ्या आहे. या बुद्धीबळातील सोंगट्याकडे जसे पाहता येते त्याप्रमाणे जो संसाराकडे पाहील तोच अवतारांचा अवतार असेल. बुद्धीबळातल्या सोंगट्या ज्याप्रमाणे काही काळ पटावर असतात त्याप्रमाणे समोर दिसणाऱ्या संसारातली माणसे इथे असतात आणि त्यांचे नियंत्रण मायेचे नियंत्रण करणाऱ्याच्या हातात असते. मग त्यातील कुणी श्रीमंत झाले किंवा गरीब झाले तरी असा कोणता फरक पडणार आहे? अरे सगळंच असार आहे तिथे सार कशात येणार? हे लक्षात घेऊन जो वेदात सांगितल्यानुसार वर्तन करेल त्याच्याच हातून मुक्ती नंतरची भक्ती घडू शकेल. संसारातून निवृत्त होऊन खूपजणांनी मुक्ती मिळवली हे खरं पण त्यांना ही मुक्तीनंतरची दुर्गम भक्ती अतक्मर्यच राहिली. त्यामुळे ती कशी असते, ती करणाऱ्यात कोणते सामर्थ्य येते हे समजलेलेच नसते. ज्याला माझी अवतारस्थिती, अवतरतील माझे सामर्थ्य याची कल्पना असते तोच मोक्षानंतरची भक्ती करतो त्याला त्याच्या सामर्थ्याची कल्पना येऊ शकते. उद्धवाला अशा पद्धतीने अगाध गती प्राप्त झाली. येथून पुढे त्याच्या हातून सर्व लोकांच्यावर उपकार करण्याच्या दृष्टीने कार्य होण्यासाठी  त्याला ब्राह्मणाच्या शापापासून वाचवावे या हेतूने भगवंतानी स्वत:च उपाय करायचे ठरवले. उद्धवाला जरी ब्रह्मज्ञान झालेले असले तरी ब्राह्मणाचा शाप अतिदाऊण असतो हे भगवंताना महित होते. नारदमुनिना ब्रह्मज्ञान होते पण त्यांना दक्षाच्या शापाचे बंधन होते. त्या शापामुळे एका ठिकाणी राहू शकत नव्हते. त्यांना सदैव परिभ्रमण करावे लागे. असे काही उद्धवाच्या बाबतीत होऊ नये, त्याचा विनाश होऊ नये अशी भगवंताची इच्छा होती. यादवांनी ब्राह्मणांचा अपमान करून, स्वत:चा घात करून घेतला होता आणि उद्धवाचा जन्म यादवकुलात झालेला असल्याने त्यालाही यादवाना मिळालेला शाप लागू होता. त्याला शापापासून दूर ठेवणे आवश्यक होते. म्हणून त्याला येथून लांब पाठवण्याचे त्यांनी ठरवले. त्यादृष्टीने त्याला बद्रिकाश्र्रमात पाठवणे योग्य होते. उद्धवाला ब्रह्मज्ञान झालेले असले तरी त्या ब्रह्मज्ञानापेक्षा बद्रिकाश्र्रम पावन होता त्यामुळे तेथे तो जर गेला तर त्याला शाप भोवणार नाही हे लक्षात घेऊन भगवंतानी हा निर्णय घेतला होता. उद्धव जरी यादव कुळातला असला तरी यादवांच्याप्रमाणे त्याला सत्तेची आणि संपत्तीची मस्ती आलेली नव्हती आणखी विशेष सांगायचे म्हणजे त्याच्यात भगवंताच्या अवतारात जी शक्ती असते त्यापेक्षा कितीतरी जास्त शक्ती आलेली होती. असे उद्धवासारखे अनर्घ्य रत्न वाचवलेच पाहिजे या हेतूने भगवंतानी त्याला बद्रिकाश्र्रमात पाठवायचे ठरवले.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article