महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देवानेच मला वाचविले : डोनाल्ड ट्रम्प

07:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अवैध स्थलांतरितांमुळे अमेरिकेला धोका : बिडेन प्रशासनाला केले लक्ष्य : हल्ल्याच्या 5 दिवसांनी सभा संबोधित

Advertisement

वृत्तसंस्था /न्यूयॉर्क

Advertisement

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 13 जुलै रोजी झालेल्या घातक हल्ल्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच जाहीर सभेत भाषण केले आहे. विस्कॉन्सिन प्रांतात होत असलेल्या रिपब्लिक पार्टीच्या कन्व्हेंशनमध्ये ट्रम्प यांनी स्वत:च्या समर्थकांना संबोधित केले. यादरम्यान त्यांनी अध्यक्षपदासाठीच्या पक्षाच्या उमेदवारीचा स्वीकार केला. ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान त्यांच्या पत्नी मेलानिया समवेत पूर्ण परिवार उपस्थित होता. यावेळी ट्रम्प यांनी घातक हल्ल्यातून देवानेच वाचविले असल्याचे उद्गार काढले आहेत.

पार्टी कन्व्हेंशनमध्ये ट्रम्प यांचे हे सर्वात मोठे भाषण होते. ट्रम्प यांनी 92 मिनिटांपर्यंत भाषण केले. यादरम्यान त्यांनी अवैध स्थलांतरितांना लक्ष्य करत त्यांची तुलना एलियन्सशी (परग्रहवासीय) केली आहे. अमेरिकेत नोकऱ्या कुणाला मिळत आहेत? अमेरिकेच्या नोकऱ्या अवैध एलियन्स गिळकृंत करत आहेत. ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांची तुलना चित्रपटजगतातील मॉन्सटर्सशी करत ते अमेरिकन नागरिकांना गिळकृंत करतील, अशी भीती व्यक्त केली.

गोळीबाराच्या घटनेच्या दिवशी देखील ट्रम्प हे अवैध स्थलांतरितांच्या विरोधात बोलत होते. ट्रम्प यांनी हल्ल्याचा अनुभव स्वत:च्या समर्थकांसमोर मांडला. मी पुन्हा त्याविषयी कधीच बोलू शकणार नाही. मी आज समर्थकांदरम्यान आहे, कारण त्या दिवशी देव माझ्यासोबत होता. माझा हात रक्ताने माखला होता. परंतु गोळीबारादरम्यान मी शांत राहिलो. माझे समर्थक तेथून पळाले नाहीत. ते माझ्यासोबत ठामपणे उभे राहिले. सीक्रेट सर्व्हिसच्या टीमने देखील चांगले काम केल्याचे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेचा कर्जाचा भार घटविणार

आम्ही आमच्या देशावरील कर्जाचा भार कमी करू आणि जनतेवरील कराचा भार देखील घटविणार आहोत. अमेरिकेतील वर्तमान प्रशासनाच्या काळात आवश्यक वस्तूंच्या किमती 57 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. तर पेट्रोलच्या किमतीत 60-70 टक्क्यांची वाढ झाली आहे. माझ्या कार्यकाळात देशात महागाई नव्हती. मी अध्यक्ष झालो तर देशातील इंधनाचा खर्च कमी करणार आहे. यामुळे वाहतूक, उत्पादन आणि देशांतर्गत सामग्रीच्या किमती कमी होतील, असा दावा ट्रम्प यांनी केला.

इस्लामिक स्टेटचा पाडावा

ट्रम्प हे विदेश धोरणावरून जो बिडेन प्रशासन विरोधात आक्रमक दिसून आले. आम्ही 85 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्रs अफगाणिस्तानात सोडून आलो आहोत. सद्यकाळात जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जात आहे. सीरियात इस्लामिक स्टेटला माझ्या प्रशासनाच्या कार्यकाळात केवळ 3 महिन्यांत पराभूत करण्यात आले होते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

रशियाने कब्जा केला नव्हता

ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धासाठी डेमोक्रेटिक पार्टी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. अध्यक्ष बुश यांच्या कार्यकाळात रशियाने जॉर्जियावर हल्ला केला. अध्यक्ष ओबामांच्या कार्यकाळात रशियाने क्रीमियावर कब्जा केला. तर सध्या रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. माझ्या कार्यकाळात रशिया काहीच करू शकला नव्हता. मी पुन्हा अध्यक्ष झालो तर जगावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला संपवेन. जर मी अध्यक्ष असतो तर रशिया-युक्रेन युद्धच सुरू झाले नसते. हमास इस्रायलवर हल्ला करू शकला नसता. रशियाने सध्या क्युबाच्या किनाऱ्यापासून 96 किलोमीटर अंतरावर स्वत:ची आण्विक पाणबुडी तैनात केली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

इतर देशांमधील कैदी अमेरिकत

अमेरिकेत अवैध स्थलांतरितांचे लोंढे दाखल होत आहेत. या अवैध स्थलांतरितांमुळे अमेरिकन नागरिक संकटात येणार आहेत. आमच्या देशातील गुन्ह्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. अन्य देश स्वत:च्या गुन्हेगारांना आमच्या देशात पाठवत आहेत. अवैध स्थलांतरितांनीच अमेरिकेतील नोकऱ्यांवर ताबा मिळविला आहे. अमेरिकेच्या इतिहासात 10 सर्वात वाईट अध्यक्षांना एकत्र केले तरीही त्यानी देशाला जितके नुकसान पोहोचविले नसेल, त्यापेक्षा अधिक नुकसान बिडेन यांनी पोहोचविले असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article