For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

लहान राज्यांमध्ये गोव्याची कामगिरी ‘सर्वोत्कृष्ट’

06:17 AM Mar 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
लहान राज्यांमध्ये गोव्याची कामगिरी ‘सर्वोत्कृष्ट’

’एनडीटीव्ही’ चा गोव्याला पुरस्कार

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

देशातील लहान राज्यांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट कामगिरी’ साठी देण्यात येणारा एनडीटीव्हीचा 2023-24 वर्षासाठीचा पुरस्कार गोव्याला प्राप्त झाला आहे.एनडीटीव्हीच्या शनिवारी नवी दिल्लीत झालेल्या ‘इंडियन ऑफ द इयर’ या कार्यक्रमात पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांच्याहस्ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी सेबीचे माजी अध्यक्ष यु. के. सिन्हा यांचीही उपस्थिती होती.

Advertisement

या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात चमक दाखविणाऱ्या तसेच समाजाचा पाया मजबूत करतानाच ब्रँड इंडियाच्या उभारणीतही मदत केलेल्या अनेक प्रख्यात व्यक्तिमत्वांना एनडीटीव्हीतर्फे इंडियन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.