गोव्याच्या जीएसटी संकलनात 3 टक्क्यांनी घट
प्रतिनिधी/ पणजी
जीएसटी संकलनात गोव्याला ऑक्टोबर महिन्यात एकूण 545 कोटी ऊपये महसूल प्राप्त झाला. मात्र गतवर्षीच्या या महिन्याच्या तुलनेत त्यात 3 टक्के घट दिसून आली आहे. गतवर्षी 559 कोटी ऊपये प्राप्त झाले होते. केंद्र सरकारने जीएसटी कर कमी केल्याचा परिणाम म्हणून ही घट दिसून आली आहे.
अन्य राज्यांचा विचार करता ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राने सर्वाधिक 32.25 हजार कोटी ऊपये महसूल मिळवला आहे. त्यानंतर कर्नाटकने 14.395 हजार कोटी तर तामिळनाडूने 11.588 हजार कोटी ऊपये जीएसटी संकलन केले आहे. मिझोरमने सर्वात कमी 40 कोटी ऊपये तर केंद्र शासित प्रदेश असलेल्या दिल्लीने सर्वाधिक 8.538 हजार कोटी ऊपये जीएसटी संकलित केला आहे. संपूर्ण देशाचा विचार करता मात्र यंदा 2 टक्के जादा जीएसटी संकलन झाले आहे.
यंदा एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये केंद्राने जीएसटीद्वारे गोव्यातून 1,718 कोटी ऊपये संकलन केले आहे. त्यातील दुसऱ्या टप्प्यातील आयजीएसटी वाटा म्हणून केंद्राने गोव्याला 1,493 कोटी ऊपये दिले आहेत. गतवर्षी हा वाटा 1,451 कोटी ऊपये होता.