कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कणकुंबी तपासनाक्याजवळ गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त

06:55 AM Oct 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

होसूरच्या युवकाला नोटीस : 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

कणकुंबी तपासनाक्याजवळ गोव्याहून बेळगावला येणारे एक आयशर वाहन अडवून गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. शुक्रवारी अबकारी विभागाने ही कारवाई केली असून साऊंड बॉक्समधून दारूची वाहतूक करण्यात येत होती. या प्रकरणी होसूर येथील वाहनचालकाला नोटीस देण्यात आली आहे.

शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी अबकारी अधिकाऱ्यांनी कणकुंबी तपासनाक्याजवळ केए 22 डी 6030 क्रमांकाचे गुड्स कॅरिअर वाहन अडवून तपासणी केली. या वाहनात वेगवेगळ्या कंपन्यांची 287.370 लिटर गोवा बनावटीचा दारू होती. एकूण 34 बॉक्स दारू अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. बेळगाव उपविभागाचे अबकारी उपअधीक्षक रवी मुरगोड, मंजुनाथ मेळ्ळीगेरी, जयराम हेगडे, बाळगौडा पाटील, मंजू मास्तमर्डी, मास्तमर्डी, कुरहट्टी व यलगौडा पाटील आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. वाहनचालक अक्षय सहदेव मॅगीनमनी (वय 30) राहणार होसूर याला नोटीस देण्यात आली आहे.

या गुड्स वाहनातून साऊंड बॉक्सची वाहतूक करण्यात येत होती. एकूण 10 पैकी साऊंड बॉक्स आकाराच्या 3 बॉक्समधून वेगवेगळ्या कंपन्यांची दारू बेळगावला आणण्यात येत होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिस्की, रम, व्होडका, जिन आदी वेगवेगळ्या प्रकारची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत 15 लाख 6 हजार 240 रुपये इतकी होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article