कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अनमोड अबकारी नाक्यावर गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त

06:44 AM Mar 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/ रामनगर

Advertisement

गोवा येथून राणेबेन्नूर येथे मिनी अशोक लेलँड टेम्पोमधून गोवा बनावटीचा दारूसाठा नेत असल्याची माहिती मिळाल्याने अनमोड अबकारी अधिकाऱ्यांनी शनिवार दि. 8 रोजी पहाटेच्या वेळेस सदर वाहनाची तपासणी केली. त्यावेळी यामध्ये गोवा बनावटीच्या काजू फेनी नामक कंपनीच्या 48 बाटल्या अनेक पोत्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या  आढळून आल्या. त्यामुळे अनमोड अबकारी अधिकाऱ्यांनी टेम्पोसह गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त केला. सदर दारू वाहतूक प्रकरणी मोहम्मद अली करजगीबिन (ता. राणेबेन्नूर, जि. हावेरी) याला ताब्यात घेतले आहे. वाहनासह 8 लाख 12 हजार ऊपयांचा ऐवज अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. सदर मिनी टेम्पो हावेरी येथून कलिंगडची वाहतूक करून परत येताना गोवा बनावटीचा दारूसाठा नेत होता, अशी माहिती सांगण्यात आली आहे. सदर कारवाई अनमोड अबकारी उपनिरीक्षक टी. बी. मल्लान्नावर, कर्मचारी श्रीकांत जाधव, दीपक बारामती, महांतेश हन्नूर आदींनी केली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article