For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऊर्जा खात्याचा लाभ गोव्याला मिळवून देणार

01:15 PM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऊर्जा खात्याचा लाभ गोव्याला मिळवून देणार
Advertisement

उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्वीकारला ताबा

Advertisement

पणजी : उत्तर गोवा खासदार व केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल मंगळवारी नवी दिल्लीत आपल्या कार्यालयाचा ताबा घेतला आणि कामकाजास सुऊवात केली. ऊर्जा मंत्रालयातील कर्मचारी, अधिकारी यांची त्यांनी बैठक घेतली. ऊर्जा खाते महत्त्वाचे असून त्यावरच देशाची प्रगती अवलंबून आहे. प्रत्येक घर, उद्योग, आस्थापने यांना ऊर्जा पुरवणे हे ध्येय असून मागणी व पुरवठा यामधील दरी कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहाणार असल्याचे निवेदन नाईक यांनी त्या बैठकीतून बोलताना केले. गोवा राज्यासंदर्भात ते म्हणाले की, गोव्याला वाढीव ऊर्जा आवश्यक असून ती मिळाली की राज्याच्या विकासात भर पडणार आहे. ऊर्जा क्षेत्रात गोव्यात भरीव कामगिरी करण्यासाठी मोठा वाव असून हरित ऊर्जेवरही लक्ष देणे गरजेचे आहे. राज्यात सदर ऊर्जा विकसित होण्यासाठी आवश्यक ती सर्व आर्थिक मदत देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. गोव्यात भूमिगत वीजवाहिन्यांची कामे सुऊ आहेत ती पुढे नेण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. गोवा हरित व स्वच्छ ऊर्जेचे राज्य करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक घराच्या इमारतीच्या छतावर सौरऊर्जा निर्माण कऊन अतिरिक्त निर्माण होणारी वीज सरकारला विकावी अशी योजना साकारण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला.

Advertisement
Advertisement
Tags :

.