कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तुर्कीच्या नागरिकांना घरे देण्यास गोवा व्हिलास कंपनीचा नकार

12:50 PM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाकिस्तानला लष्करी मदत केल्याच्या निषेधार्थ निर्णय

Advertisement

पणजी : गोव्यात येणाऱ्या किंवा असलेल्या तुर्की देशातील पर्यटकांना राहाण्यासाठी घरे देण्यास गोवा व्हिलास रियल इस्टेट कंपनीने नकार दिला आहे. सध्या भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत असून तुर्कीने पाकची बाजू घेतल्याने कंपनीतर्फे हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. अलिकडच्या काळात तुर्कीने पाकिस्तानला विविध लष्करी उपकरणे देऊन सहकार्य केले आहे. या पार्श्वभूमीवर गोवा व्हिलास व गोवा होम-स्टे कंपन्यांनी तुर्कीच्या पर्यटकांना कसलीच सेवा देणार नसल्याचे जाहीर केले आहे. सोशल मीडियावर ‘एक्स’ या व्यासपीठावर त्याची माहिती प्रसारित करण्यात आल्याचे कंपनीने कळवले आहे.

Advertisement

गोव्यासह भारतात तुर्की नागरिकांवर कसलीच अधिकृतपणे बंदी नाही. असे असतानाही खासगी व्यवसाय करणारे त्यांना सेवा देण्यास नकार दर्शवतात हे स्पष्टपणे दिसून येते. या निर्णयामुळे तुर्की पर्यटकांची गोव्यात राहाण्याची अडचण होऊ शकते. तसेच त्यांची चुकीची धोरणे उघडकीस येतील, असे व्हिलास-होम स्टे कंपनीचे म्हणणे आहे. पाकला पाठिंबा देणाऱ्यांना मदत करणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. आम्ही भारत देशाच्या बाजूने खंबीरपणे उभे असून भारतासाठी कायम पाठिंबा देत राहाणार असल्याचे कंपनीतर्फे नमूद करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article