कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पर्यावरण अन् विकासामध्ये गोव्याने समतोल साधावा

12:28 PM Jun 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांचा गोव्याला सल्ला

Advertisement

पणजी : विकासाच्या नावाखाली भविष्यात पर्यावरण वाचले नाही, तर आपण विषारी जीवन जगणार आहोत. विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यापेक्षा गोवा राज्य एक पाऊल पुढे आहे. तरीही गोवा राज्याने पर्यावरण आणि विकास यामध्ये समतोल साधावा, असा सल्ला पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी दिला आहे. राजभवन येथे जागतिक पर्यावरणदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत’ याविषयावरील विशेष मुलाखत कार्यक्रमात डॉ. आमटे बोलत होते. यावेळी मेगासेसे पुरस्कार विजेत्या डॉ. मंदाकिनी आमटे उपस्थित होत्या. डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, गोव्याचा विकास होत असला तरी अजूनही या ठिकाणी हिरवे सौंदर्य सुरक्षित आहे, याबद्दल आपल्याला समाधान वाटते. परंतु भविष्यातही ही हिरवाई, हे सौंदर्य टिकण्यासाठी सरकार आणि लोकांनीही दक्ष राहायला हवे.

Advertisement

आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण

हेमलकला येथील अविस्मरणीय प्रसंगाबाबत बोलताना डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या, मोठा मुलगा डॉक्टर होऊन काम करायला लागला तेही जंगलातील (हेमलकसा) लोकांसाठी, हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. त्याचबरोबरच माझ्या दोन्ही मुलांच्या बायका म्हणजे सुनबाई ह्या शहरातील असूनही त्या हेमलकसा येथील कार्यात स्वत:ला झोकून देताना पाहून आमच्यासाठी सर्वोच्च क्षण ठरला, असेही त्या म्हणाल्या.

आदिवासींमध्ये सहनशक्ती खूप

हेमलकसा येथील आदिवासी बांधवांविषयी बोलताना डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, आदिवासी समाजातील लोकांसाठी किंवा या समाजबांधवांसारखी सहनशक्ती अन्य कुणामध्येही दिसून येत नाही. कारण हेमलकसा येथे ज्यावेळी आम्ही कुष्ठरोग्यांवर उपचार करायला लागलो, त्यावेळी काही अदिवासींवरही उपचार सुरू होते. अशा काळात कोणतेही औषधोपचाराची साधने नसताना जंगलातील काटेरी साधनांचा वापर करून आम्ही आदिवासी बांधवांवर शस्त्रक्रिया करीत होतो, तेव्हा जवळपास शरीराला 100 टक्के बसल्यानंतरही कोणताही आवाज नाही, गोंधळ नाही हे पाहून आदिवासींमध्ये असलेली सहनशक्तीच्या परिसिमेचे आपल्याला दर्शन झाले, असे डॉ आमटे म्हणाले.

गोव्याला संदेश देताना डॉ. आमटे दाम्पत्य म्हणाले, गोवा आणि हेमलकसा यांचे नाते फार जवळचे आहे. कारण आमटे कुटुंबामध्ये आलेल्या दोन्ही सुनबाई ह्या शहरातील असून, त्यातील एक गोव्याची आहे. पर्यावरण तज्ञ कमलाकर साधले यांची मुलगी आमच्या घरी जरी सूनबाई म्हणून आली असली तरी तिने हेमलकसा या ठिकाणी सुरू केलेले कार्य यामध्ये सूनबाईच्या रूपाने गोव्याचाही वाटा आहे, असे डॉ. प्रकाश आमटे म्हणाले. डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांची मुलाखत शिक्षक सुभाष जाण यांनी घेतली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article