For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोवा शिपयार्ड बांधणार ‘हायब्रिड हॉपर ड्रेजर’

12:08 PM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोवा शिपयार्ड बांधणार ‘हायब्रिड हॉपर ड्रेजर’
Advertisement

युरोपीयन कंपनीकडून प्रतिष्ठेचे कंत्राट

Advertisement

पणजी : गोवा शिपयार्डतर्फे लवकरच लक्झंबर्गस्थित जान दे नूल या युरोपीयन ग्रुपसाठी हायब्रिड ट्रेलिंग सक्शन हॉपर ड्रेजर जहाज बांधणार आहे. त्यासंबंधीच्या कंत्राटाच्या करारावर 6 जून रोजी स्वाक्षरी करण्यात आली. या जहाजात जैवइंधन आधारित प्लग-इन इलेक्ट्रिक बॅटरी तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून ते चार तासांपर्यंत स्वतंत्रपणे काम करू शकणार आहे. हे हॉपर ड्रेजर छोट्या बंदरांमध्ये ऑपरेट करण्यासाठी डिझाइन करण्यात आले असून जास्त लोकसंख्या असलेल्या भागात कार्य करण्यास सक्षम असेल. गोवा शिपयार्डला सध्या अशा प्रकारच्या केवळ एकाच जहाजाची बांधणी करण्याचे कंत्राट मिळाले असून पुढील दोन वर्षांमध्ये ते बांधून द्यावे लागणार आहे. त्यानंतर याच मालिकेतील दुसरे जहाज बांधण्याचे कंत्राट मिळण्याची शक्यता आहे.

सुमारे 79 मीटर लांब हे जहाज यूएलईव्ही या तंत्रज्ञानाने युक्त असून त्याला युरो 6 क्षमतेचे दुहेरी इंधन इंजिन असेल. गोवा शिपयार्डकडून सामान्यत: भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि काही मित्र देशांसाठी आतापर्यंत 200 हून अधिक जहाजे आणि 160 युद्धनौका बांधण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सशस्त्र दलांसाठी काही बिगर लष्करी जहाजे देखील बांधली आहेत. जीएसएलने विविध देशांना ‘डिफेन्स प्लॅटफॉर्म’ची निर्यात केली आहे. त्याद्वारे भारतातील डिफेन्स प्लॅटफॉर्मचा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. युरोपीयन ग्राहकासोबतचा हा प्रतिष्ठित करार जागतिक व्यावसायिक जहाजबांधणी बाजारपेठेत विविधता आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. सदर जहाज हे एका लहान हॉपर पद्धतीचे असले तरी त्यात प्रचंड कार्यक्षमता आहे. आपल्या पद्धतीचे आगळे, चपळ आणि लवचिक असे हे जहाज लहान बंदरांमध्ये काम करण्यासाठी आदर्श ठरणार आहे. डीसी हायब्रिड प्लग-इन तंत्रज्ञानामुळे हे जहाज अत्यंत नाविन्यपूर्ण असून टिकाऊपणा बाबतही त्याच्याकडून खूप मोठ्या महत्वाकांक्षा आहेत. म्हणूनच हे जहाज त्याच्या निर्धारित वेळेत हस्तांतरित करण्यावर जीएसएलचा भर राहणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.