कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोवा रस्ता सुरक्षा धोरणाची अंमलबजावणी आजपासून

12:32 PM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : राज्यात वाहन अपघातांची संख्या वाढत असून अपघातामध्ये मृत्यूंची संख्याही वाढत आहे. मृत्यूंमध्ये अधिकाधिक युवकांचा समावेश असल्याने चिंतेची बाब आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक खात्याने ‘गोवा रस्ता सुरक्षा धोरण-2025’ तयार केले असून याची अंमलबजावणी आज शनिवारपासून पुढील तीन वर्षे केली जाणार आहे. राज्यातील रस्ता सुरक्षेतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हे धोरण बनवण्यात आले आहे. सप्टेंबर 2024 अखेरीस राज्यात 13 लाख 23 हजार वाहनांची नोंदणी झाली होती. यातील 8 लाख 69 हजार दुचाकी आहेत. दरवर्षाला दुचाकींची संख्या 17 टक्क्यांनी वाढत आहे. 2023-24 मध्ये राज्यात 2 हजार 682 अपघांतांची नोंद झाली होती. यामध्ये 286 जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वसमावेशक, तंत्रज्ञांची साथ असणारे रस्ता सुरक्षा धोरण आवश्यक होते.

Advertisement

धोरणानुसार वाहनांची वैधता तपासण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी स्वयंचलित चाचणी केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव आहे. हे केंद्र वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी असणार आहे. चालकांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी देखील स्थानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी एआय पद्धतीच्या वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा समावेश करण्यात येणार आहे. अपघातप्रवण क्षेत्रांचा शास्त्राrय पद्धतीने अभ्यास करून यावर उपाययोजना काढण्यात येणार आहेत. ‘गोवा रस्ता सुरक्षा धोरण-2025’ मध्ये रस्ता सुरक्षा, सुरक्षित वाहने, चालकांचे प्रशिक्षण, एआय तंत्रज्ञानाचा वापर, रस्ता अभियांत्रिकी सुधारणा, वाहनांना 100 टक्के उच्च सुरक्षा नंबर प्लेट्स बसवणे, सर्व परिवहन वाहनांमध्ये ट्रेकिंग उपकरण व स्पीड गव्हर्नर्स, अपघात प्रवण क्षेत्रात आपत्कालीन कॉल बॉक्स बसवण्याचा प्रस्ताव आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article