महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वच्छ सर्वेक्षण रँकिंगमध्ये देशात गोवा 13 व्या स्थानी

10:49 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजीसह सांखळीचाही स्वच्छतेबाबत गौरव

Advertisement

पणजी : गतवर्षीच्या म्हणजे 2023 सालच्या स्वच्छ सर्वेक्षण रँकिंगमध्ये गोवा राज्य हे देशातील 27 राज्यांमध्ये 13 व्या स्थानावर आहे, तर सर्वात स्वच्छ राज्य म्हणून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल गुरुवारी दिल्ली येथे एका कार्यक्रमात स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 प्रदान केले. स्वच्छ सर्वेक्षण हे भारतातील गावे व शहरांमधील स्वच्छतेचे वार्षिक सर्वेक्षण आहे. 56 व्या राष्ट्रीय मानांकनासह पणजीला गोव्यातील एक लाखाहून अधिक लोकसंख्येचे, जलद गतीने चालणारे शहर, सर्वात स्वच्छ शहर म्हणून गौरवण्यात आले आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सांखळी राष्ट्रीय स्तरावर 867 व्या क्रमांकावर असले तरी, इतर सर्व शहरांची क्रमवारी सांखळीपेक्षा वाईट असल्याने त्या श्रेणीत ते गोव्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले गेले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article