For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्याचे आमदार उल्हास तुयेकर यांची वेंगुर्ला न.प.च्या विविध प्रकल्पांना भेट

12:00 PM Dec 06, 2023 IST | अनुजा कुडतरकर
गोव्याचे आमदार उल्हास तुयेकर यांची वेंगुर्ला न प च्या विविध प्रकल्पांना भेट
Advertisement

वेंगुर्ला न. प. च्या सर्व प्रकल्पांबाबत आमदारांनी काढले गौरवोद्वगार

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

गोवा विधानसभा आमदार तथा कदंबा परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास यशवंत तुयेकर व डावरलीम, साळिस्ते गोवा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांनी मंगळवार दि. ५ डिसेंबर रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विविध प्रकल्पांना भेट दिली. या सर्व प्रकल्पांच्या यशस्वीततेबाबत मुख्याधिकारी परीतोष कंकाळ, प्रशासन व नागरिक यांच्या सामुदायिक कामाबाबत गौरवोदगार काढून हे प्रकल्प गोवा राज्यात राबविण्याबाबत त्यांनी मनोदय व्यक्त केला.

Advertisement

राष्ट्रीय स्तरावर अव्वल नामांकन प्राप्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्या “स्वच्छ भारत पर्यटन स्थळ" (कंपोस्ट डेपो) येथील विकसित करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध प्रक्रिया केंद्रांची पाहणी करण्यासाठी गोवा विधानसभा आमदार तथा कदंबा परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास यशवंत तुयेकर, दवल्ली दिकरपाल नावेली या पंचायत समिती मतदार संघातील दिवली नावेली गावचे सरपंच संतोष नाईक, उपसरपंच सायमन कार्वालो, ग्रामपंचायत सदस्य साईश राजाध्यक्ष, विद्याधर आर्लेकर, श्रीमती मिशल मिरांडा, श्रीमती संपदा नाईक, व्ही. डी.सी.चे चेअरमन जयानंद देसाई, मेंबर दिनेश माने, रवी अमरापुरकर, नारायण कांबळी आदी पथक. मंगळवार दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी आलेले होते. सुरुवातीला मान्यवरांना नाटककार मधुसुदन कालेलकर सभागृह या ठिकाणी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत बनविण्यात आलेल्या स्वच्छता संकल्पनेवर आधारित विविध व्हिडीओ, प्रेजेटेंशनद्वारे शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नाविन्यपूर्ण विकास कामे यांची माहिती देण्यात आली.

नंतर सर्वानी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, मिरॅकल पार्क, सांडपाणी व मैलापाणी व्यवस्थापन प्रकल्प यांची पाहणी केली. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ (कंपोस्ट डेपो) येथील 'वेस्ट टु बेस्ट संकल्पनेनुसार विकसित करण्यात आलेल्या मिरॅकल पार्क व यमादोरी गार्डन या ठिकाणांना भेट दिली.

यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, नगरपरिषदेचे स्वच्छता ब्रँड अँम्बेसिडर सुनिल नांदोस्कर, शहरातील पत्रकार आणि इतर नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.