For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कावळेवाडीजवळ गोवा बनावटीची साडेतीन लाखाची दारू जप्त

06:33 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
कावळेवाडीजवळ गोवा बनावटीची साडेतीन लाखाची दारू जप्त
Advertisement

ट्रकसह साडेआठ लाख किंमत : दोघा जणांना अटक, चालक फरार

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

गोवा बनावटीची बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी अबकारी विभागाची कारवाई सुरूच आहे. बिजगर्णीहून कावळेवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर एक ट्रक अडवून साडेतीन लाखाची बेकायदा दारू जप्त करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

अधिकाऱ्यांनी याप्रकरणी दोघा जणांना अटक केली असून ट्रकचालकाचा शोध घेण्यात येत आहे. नागेश नारायण पाटील (वय 34), साहिल लक्ष्मण पाटील (वय 19) दोघेही राहणार बहाद्दरवाडी अशी त्यांची नावे आहेत. केए 22 सी 9398 क्रमांकाच्या अशोक लेलँड ट्रकमध्ये चोर कप्पे तयार करून बेकायदा दारू वाहतूक केली जात होती.

अबकारी अधीक्षक विजयकुमार हिरेमठ, उपअधीक्षक रवी मुरगोड, मंजुनाथ गलगली, सुनील पाटील, महादेवप्पा कटगेन्नावर आदींनी ही कारवाई केली असून ट्रकसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रकच्या पाठीमागे पार्टीशन करून गोवा बनावटीच्या नऊ वेगवेगळ्या ब्रँडची दारू वाहतूक करण्यात येत होती.

760 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून अधिकाऱ्यांनी एकूण 239 लिटर 400 मिली गोवा बनावटीची दारू ताब्यात घेतली आहे. केवळ कणकुंबी येथील तपासनाक्यावरच नव्हे तर आडमार्गावरही तपासणी करून बेकायदा दारू वाहतूक रोखण्यात येत आहे. अबकारी विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, सहआयुक्त फिरोजखान किल्लेदार, उपायुक्त वनजाक्षी एम. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.